डाॅ. संदीप डाकवे यांनी संगीत वाद्यांमधून साकारले लतादिदींचे चित्र

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गेली ७ दशकाहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचे भावविश्व समृद्ध केले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी संगीत क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या वाद्यांच्या प्रतिमांचा खुबीने वापर करत लतादिदींचे अप्रतिम चित्र तयार केले आहे.

लतादिदींचे संपूर्ण आयुष्य संगीतक्षेत्राला वाहिलेले होते. त्यामुळे या क्षेत्रात वापरण्यात येत असलेल्या वीणा, तंबोरा, सतार, तबला, हार्मोनियम, मृदंग, ढोलकी, गिटार, व्हायोलिन, सनई, पेटी, झांज, बासरी, टाळ, माईक, हेडफोन, नोटेशन व अन्य संगीत साधनांचा वापर करुन डाॅ.डाकवे यांनी लतादिदींचे चित्र तयार केले आहे. असे अनोखे चित्र रेखाटून डाॅ. डाकवे यांनी लता मंगेशकर यांना चित्रमय आदरांजली वाहिली आहे.

यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांनी शब्द, ठिपके, अक्षरे यामधून विविध चित्रे रेखाटली आहेत. वाद्यांचा वापर करुन तयार केलेेले हे त्यांचे पहिले चित्र आहे. डाॅ.डाकवे यांनी विविध प्रसंगानुरुप रेखाटलेली चित्रे मंत्रमुग्ध करुन घेतात. तसेच कलेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी संगीत वाद्यांची प्रतिके वापरुन केलेले लतादिदींचे चित्र सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

You cannot copy content of this page