एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 3 (जि.मा.का.) :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांनी विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.

सध्यास्थितीत महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती लाभार्थ्यांच्या अर्जांचे प्रमाण कमी असल्याने क्षेत्रीय स्तरावर मोहीम राबविण्यात येत आहे. सन २०२३-२४ करीता जिल्ह्यात अनुसुचित जाती प्रवर्गासाठी ९.७६ लाख व अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी १ लाख असा एकुण १०.७६ लाख एवढा निधी शिल्लक आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२३-२४ साठी अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना ३५ ते ५० टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यानी महाडीबीटी पोर्टलवर

या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व सीएससी केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. राऊत यांनी केले आहे.