दक्षिण आफ्रिकेचे संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात इस्त्राईलवर नरसंहाराचा आरोप

इस्त्राईलच्या परराष्ट्रमंत्रालयाने हे आरोप तथ्यनिष्ठ आणि कायदेशीर आधार नसलेले सांगून, सर्व आरोप फेटाळले.

दक्षिण आफ्रिकेने २९ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात इस्राईलवर नरसंहारचा आरोप करून न्यायालयास गाझा पट्टीतील युद्ध रोखण्याचे आदेश देण्याची विनंती केली. दक्षिण आफ्रिकेच्या म्हणण्यानुसार इस्त्राईल पॅलेस्टाईन जनतेचा नाश करण्याचा प्रयत्न करत असून त्याची तुलना ९० च्या दशकातील दक्षिण आफ्रिकेवर शासन करणाऱ्या वर्णद्वेष्ट्यांसोबत केली.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा “तथ्यनिष्ठ आणि कायदेशीर आधार नसलेला” म्हणून फेटाळून लावला. इस्रायलने अनेकदा म्हटले आहे की ते हमास या दहशतवादी संघटनेशी (ज्यांना इस्राईल राष्ट्राचा सर्वनाश करायचा आहे.) युद्ध करत आहे, गाझातील नागरिकांशी नाही.

इस्रायलमधील दक्षिण आफ्रिकेच्या मुत्सद्दींना परत बोलावताना, वर्णभेद विरोधी कार्यकर्त व दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती श्री. रामाफोसा म्हणाले की, गाझा व वेस्ट बँकवर होणारे तीव्र हवाई हल्ले जग असहाय्यपणे पाहत आहे. त्यामुळे तेथील शैक्षिणक इमारती, आरोग्य व्यवस्था, नागरी पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत.

गाझान आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी युद्ध सुरू झाल्यापासून गाझामध्ये २०,००० हून अधिक पॅलेस्टिनी मरण पावले आहेत. त्या दिवशी इस्रायलवर हमासच्या नेतृत्वाखाली झालेल्या हल्ल्यात अंदाजे १,२००० लोक मरण पावले, असे इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page