फॅनी चक्रीवादळाचे ओदिशात ८ बळी, वादळाचा वेग कमी झाला, वादळ दुपारपर्यंत बांग्लादेशच्या किनाऱ्यावर आदळणार
भुवनेश्वर:- ओदिशात शुक्रवारी ताशी १७५ किलोमीटर वेगाच्या ‘फॅनी ’ चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला; नंतर त्याची तीव्रता कमी झाली. फॅनी चक्रीवादळाचे ओदिशात ८ बळी गेले असून आता वादळाचा वेग कमी झाला आहे. सदर वादळ दुपारपर्यंत बांग्लादेशच्या किनाऱ्यावर आदळणार आहे. फॅनी चक्रीवादळ सकाळी आठ वाजता पुरी येथे थडकले. त्यामुळे अनेक झोपडय़ा उडून गेल्या. अनेक झाडे पडली. कोट्यवधीं रुपयांचे नुकसान झाले. पश्चिम बंगालमधील कोलकात्यासह काही ठिकाणी त्यामुळे जोरदार पाऊस झाला.आता वादळाचा वेग कमी झाला असून वादळ दुपारपर्यंत बांग्लादेशच्या किनाऱ्यावर आदळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचा आहे. वादळग्रस्त राज्यांना १ हजार कोटींची मदत मंजूर केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.