महापूरबाधित जनतेसाठी गॅलेक्सी हॉस्पिटलची (वारणानगर कोडोली) आरोग्य सेवा

कोल्हापूर:- अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. बरेच रस्ते बंद असणे, विदयुत सेवा खंडित होणे अशा स्थितीत आरोग्य सुविधांची सेवा पुरवणे व मिळवणे अवघड झाले आहे. गॅलेक्सी हॉस्पिटल वारणानगर येथे २४ तास स्त्रीरोगतज्ज्ञ, सर्जन, अस्थीरोगतज्ञ, बाल रोग तज्ञ, भुलतज्ञ यांची सेवा गरजूंना याही परिस्थितीत उपलब्ध आहे, गरजूंनी याची नोंद घ्यावी असे सेवाभावी आवाहन हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने केले आहे. हॉस्पिटलचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. 9421317398 / 02328-224175 / 02328-224050

दरम्यान हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने पूरबाधित ग्रामीण भागात जाऊन वैद्यकीय उपचार देण्यास सुरुवात केली आहे.

You cannot copy content of this page