नाशिकमध्ये गंभीर पूरपरिस्थितीत अनिरुद्धाज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची कौतुकास्पद सेवा
नाशिक:- संततधार पावसामुळे नाशिकमध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली असताना नाशिक ए ए डी एम तर्फे रविवार कारंजा ते मालेगाव स्टँड दरम्यान पुलावर दोन्ही बाजूने पंचवटी पोलीसांच्या मागणीनुसार सेवा करण्यात आली. या सेवेसाठी नाशिक शहरातील सर्वच केंद्रातून ३२ डी. एम. व्ही. नी सहभाग नोंदवला. पावसामुळे सगळीकडचे रस्ते पाण्याने भरलेले असतानाही डी एम व्ही या सेवेसाठी तत्परतेने हजर झाले. पोलीस प्रशासनाने ह्या सेवेचे कौतुक केले आहे. अक्षरश: पुलाच्या एका बाजूने रविवार कारंजाच्या बाजूला परिस्थिती पोलिसांच्याही आवाक्यात नसताना डी एम व्ही नी तिथे पोलिसांना मदत केली आणि सर्व काही व्यवस्थित झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने डी एम व्ही चे ओळखपत्र पाहून आभार मानले.