गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपालांच्या हस्ते खेळाडूंचा होणार सन्मान – क्रीडामंत्री विनोद तावडे

राज्य शासनाचे २०१७ – १८ चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर;
उदय देशपांडे यांची जीवनगौरव, तर साहसी क्रीडा पुरस्कारासाठी प्रियांका मोहिते यांची निवड

मुंबई:- राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १७ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी काल आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सन २०१७ – १८ या वर्षांचे पुरस्कार देण्यात येणार असून खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदींना गौरवण्यात येणार आहे. मल्लखांबसाठी योगदान देणाऱ्या उदय देशपांडे यांना सन २०१७ – १८ यावर्षीचा जीवगौरव पुरस्कार तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांना जाहीर करण्यात आला आहे.

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार १५ जणांना घोषित करण्यात आला आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

अमेय शामसुंदर जोशी (जिम्नॅस्टिक्स), सागर श्रीनिवास कुलकर्णी (जिम्नॅस्टिक्स), गजानन पाटील, पुणे (अथलेटिक्स), मृणालीनी वैभव औरंगाबादकर (बुध्दीबळ), संजय बबन माने (कुस्ती), डॉ. भूषण पोपटराव जाधव (तलवारबाजी), उमेश रमेशराव कुलकर्णी (तायक्वोंदो), बाळकृष्ण मलप्पा भंडारी (तायक्वोंदो), स्वप्नील सुनील धोपाडे (बुध्दीबळ), निखिल सुभाष कानेटकर (बॅडमिंटन), सत्यप्रकाश माताशरन तिवारी (बॅडमिंटन), दीपाली महेंद्र पाटील (सायकलिंग), पोपट महादेव पाटील (कबड्डी), राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग), डॉ.लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे (वॉटरपोलो) यांना जाहीर झाला असल्याची घोषणा श्री. तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सन २०१७ – १८ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

आर्चरी- प्रवीण रमेश जाधव, भाग्यश्री नामदेव कोलते
अथलेटिक्स- सिध्दांत उमानंद थिंगलिया (थेट पुरस्कार), मोनिका मोतीराम आथरे (थेट पुरस्कार), कालिदास लक्ष्मण हिरवे, मनीषा दत्तात्रय साळुंखे
ट्रायथलॉन- अक्षय विजय कदम
वुशु – शुभम बाजीराव जाधव, श्रावणी सोपान कटके
स्केटिंग- सौरभ सुशील भावे
हॅण्डबॉल- महेश विजय उगीले, समीक्षा दामोदर इटनकर
जलतरण- श्वेजल शैलेश मानकर, युगा सुनील बिरनाळे
कॅरम- पंकज अशोक पवार, मैत्रेयी दत्तात्रय गोगटे
जिम्नॅस्टिक्स- सागर दशरथ सावंत, दिशा धनंजय निद्रे
टेबल टेनिस- सुनील शंकर शेट्टी
तलवारबाजी- अक्षय मधुकर देशमुख, रोशनी अशोक मुर्तंडक
बॅडमिंटन- अक्षय प्रभाकर राऊत, नेहर पंडित
बॉक्सिंग- भाग्यश्री शिवकुमार पुरोहित
रोईंग- राजेंद्र चंद्रबहादुर सोनार, पूजा अभिमान जाधव
शुटींग- हर्षदा सदानंद निठवे
बिलीयर्डस अँड स्नूकर- धृव आश्विन सित्वाला, सिध्दार्थ शैलेश पारीख
पॉवरलिप्टींग- मनोज मनोहर गोरे, अपर्णा अनिल घाटे
वेटलिप्टींग- दीक्षा प्रदीप गायकवाड
बॉडीबिल्डींग- दुर्गाप्रसाद सत्यनारायण दासरी
मल्लखांब- सागर कैलास ओव्हळकर
आट्यापाट्या- उन्मेष जीवन शिंदे, गंगासागर उत्तम शिंदे
कबड्डी- विकास बबन काळे, सायल संजय केरीपाळे
कुस्ती- उत्कर्ष पंढरीनाथ काळे, रेश्मा अनिल माने
खो-खो- अनिकेत भगवान पोटे, ऐश्वर्या यशवंत सावंत
बुध्दीबळ- राकेश रमाकांत कुलकर्णी (थेट पुरस्कार), दिव्या जीतेंद्र देशमुख (थेट पुरस्कार), रोनक भरत साधवानी (थेट पुरस्कार), सलोनी नरेंद्र सापळे (थेट पुरस्कार), हर्षिद हरनीश राजा (थेट पुरस्कार)
लॉन टेनिस- ऋतुजा संपतराव भोसले
व्हॉलीबॉल- प्रियांका प्रेमचंद बोरा
सायकलिंग- रवींद्र बन्सी करांडे, वैष्णवी संजय गभणे
स्कॅश- महेश दयानंद माणगावकर, उर्वशी जोशी
क्रिकेट- स्मृती मानधना
हॉकी- सूरज हरिशचंद्र करेकरा

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) म्हणून पुढीलप्रमाणे नावे घोषित करण्यात आली आले आहे. यामध्ये मुंबई विभागाचे अंकुर भिकाजी आहेर, पुणे विभागाचे महेश चंद्रकांत गादेकर, कोल्हापूर विभागाचे मुन्ना बंडू कुरणे, अमरावती विभागाचे डॉ.नितीन गणपतराव चवाळे, नाशिक विभागाचे संजय आनंदराव होळकर, लातूर विभागाचे जनार्दन एकनाथ गुपिले, नागपूर विभागाचे राजेंद्र शंकरराव भांडारकर यांचा समावेश आहे.

तसेच सन २०१७ – १८ या वर्षांसाठी दिव्यांग खेळाडूंना एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत.
संदीप प्रल्हाद गुरव- व्हीलचेअर- तलवारबाजी (थेट पुरस्कार), मानसी गिरीशचंद्र जोशी- बॅडमिंटन (थेट पुरस्कार), मार्क जोसेफ धर्माई- बॅडमिंटन (थेट पुरस्कार), रुही सतीश शिंगाडे- बॅडमिंटन (थेट पुरस्कार), सुकांत इंदुकांत कदम- बॅडमिंटन (थेट पुरस्कार), गीतांजली चौधरी- जलतरण, स्वरुप महावीर उन्हाळकर – नेमबाजी (थेट पुरस्कार), चेतन गिरीधर राऊत- जलतरण, आदिल मोहमंद नाझिर अन्सारी- आर्चरी (थेट पुरस्कार)

पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली असून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी तीन लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ब्लेझर असे देण्यात येईल. तर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ब्लेझर असे आहे.

शिवछत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य त्या खेळाडू-संघटक-मार्गदर्शक यांची निवड केली असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात असल्याचे क्रीडा मंत्री श्री. तावडे यांनी पुरस्कारांची घोषणा करताना पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार निवड समितीमध्ये क्रीडा मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त यांच्यासह पद्मश्री धनराज पिल्ले, पद्मश्री प्रभाकर वैद्य, अर्जुन पुरस्कारार्थी रचिता मिस्त्री, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी प्रदीप गंधे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी जय कवळी, पॅरा ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी राजाराम घाग, अर्जुन पुरस्कारार्थी श्रीरंग इनामदार यांचा समावेश होता. या सर्व सदस्यांनी एकमताने सन २०१७ – १८ या वर्षातील पुरस्कारार्थीची निवड करण्यात आल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *