कॉस्मोपॉलिटनमध्ये मोठ्या उत्साहात इफ्तार पार्टी!

 

मुंबई:- कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोशिएशनमधील इव्हेंट मॅनेजमेंटतर्फे रमजान सणाच्या निमित्ताने नुकतेच इफ्तार पार्टीचे आयोजन कऱण्यात आले. त्यावेळी ओशिवरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तांबोळी साहेब आणि `स्टार वृत्त’चे संपादक नरेंद्र हडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोशिएशनच्या अध्यक्षा नेहा गुप्ता, सेक्रेटरी मोहन सावंत, खजिनदार मुख्तार अहमेद, ओम साईधाम देवालयाचे अध्यक्ष रवी जाधव, खजिनदार चेतन नाईक, उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोनाळकर, खजिनदार रवी भट, प्रमुख सल्लागार अब्राहर सय्यद तसेच सर्व सभासद व हिंदु-मुस्लिम बांधव भगिनी बहुसंख्येने मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

त्यांनतर ओशिवरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तांबोळी साहेब, `स्टार वृत्त’चे संपादक नरेंद्र हडकर आणि असोशिएशनच्या अध्यक्षा नेहा गुप्ता यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अब्राहर सय्यद, निझामभाई, रियाझभाई व मोहन सावंत यांनी आभार मानले. “आज देशाला धार्मिक सलोख्याची नितांत गरज आहे. ह्या धार्मिक सलोख्यातूनच देशाची उन्नती होऊ शकते. हाच धार्मिक सलोखा आज इफ्तार पार्टीत पाहता आला!” असे गौरवोद्गार पोलीस अधिकारी तांबोळी साहेब यांनी काढले.