ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत बेनी बुद्रुकच्या जि. प.शाळेचे यश

लांजा:- तालुक्यातील बेनी बुद्रुक मधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा बेनी बुद्रुक नंबर १ ने फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (BDS) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील २ विद्यार्थ्यां गोल्ड मेडलचे मानकरी ठरले असून एका विद्यार्थ्याने ब्राँझ मेडल मिळविले आहे.

इयत्ता ७ वी तील १) कु अनुश्री नितेश केळकर हिने १०० पैकी ७६ गुण मिळवून गोल्डमेडल तर इयत्ता ६ वी तील २) कु शार्दूल विलास तेंडुलकर याने १०० पैकी ८२ गुण मिळवून गोल्डमेडल ३) कु. वैष्णवी रघुनाथ वारीशे हिने १०० पैकी ६६ गुण मिळवून ब्राँझ मेडल मिळवून यश संपादन केले आहे.

याबरोबरच इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता ६ वीतील १) कु. त्रिधा चंद्रकांत भरणकर हिने १०० पैकी ६२ गुण, २) कु अथर्व नितेश केळकर याने १०० पैकी ६१ गुण, ३) कु गौरव रमेश सुर्वे याने १०० पैकी ५७ गुण,

इयत्ता ४ थी तील ४) कु मयूर परेश तळेकर याने १०० पैकी ५५ गुण, इयत्ता २ री तील ५) कु दुर्वा चंद्रकांत मिंडे हिने १०० पैकी ५१ गुण, प्राप्त करून शाळेच्या इतिहासात शाळेचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशात इयत्ता ६ वी आणि ७ वी ला शिकविणारे पदवीधर शिक्षक महेश तोडणकर सर, तसेच प्रभारी मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्र प्रमुख जनार्दन मोहिते सर, विद्यार्थ्यांचे पालक, यांचा महत्त्वाचा आणि मोठा वाटा आहे. इयत्ता -४ थी चा विद्यार्थी मयूर परेश तळेकर याला शिक्षिका मनीषा माने मॅडम यांचं तर इयत्ता २ री तील दुर्वा चंद्रकांत मिंडे हिला शिक्षिका दिपाली सावंत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक यांच्यावर शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत बेनी बुद्रुक, आणि सर्व ग्रामस्थांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page