जिल्हास्तरीय शालेय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सहभागाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि कोकण सिंधु पॉवरलिफ्टिंग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे जिल्हास्तरीय शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली यांच्याकरिता असणारी ही विनाअनुदानित स्पर्धा महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या नियमावलीनुसार संपन्न होणार आहे.

https://www.sindhudurga.mahadso.co.in/school ह्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर दिनांक ३ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी याची नोंद घेऊन स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!