दिल्लीतल्या मोहल्ला क्लिनिकमधील रुग्णांचा प्रयोगशाळा चाचणीचा घोटाळा उघडकीस
दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांचे सीबीआय कडून आरोपांबाबत चौकशी करण्याचे आदेश.
दिल्ली:- दिल्ली सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या मोहल्ला क्लिनिक मधल्या प्रयोगशाळेतील चाचण्यांचा घोटाळा उघकीस आला. सादर झालेल्या अहवालानुसार बनावट/अस्तित्वात नसलेले मोबाईल क्रमांक रुग्णांच्या प्रवेशाकरिता चिन्हांकित करण्यासाठी वापरले गेले. ह्यासंदर्भात उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी सीबीआयला चौकशीसाठी शिफारस केली आहे.
झालेल्या आरोपांनुसार, लाखो बनावट चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांना काही ठराविक देयके देण्यात आली आहेत. हा घोटाळा शेकडो कोटींचा असल्याची माहिती आहे.
दिल्ली भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी नवीन कथित घोटाळ्यावर आम आदमी पार्टी (आप) सरकारवर टीका केली की, “तथाकथित ‘मोहल्ला क्लिनिक’ने पॅथॉलॉजिकल चाचणीची सुविधा दिली खरी, परंतु दक्षता अहवाल आणि विभागीय निष्कर्षांच्या आधारे, त्या (पॅथॉलॉजिकल) चाचण्या देखील आता चौकशीच्या कक्षेत आहेत. एका दिवसात, क्लिनिकमध्ये जास्तीत जास्त ५३३ रुग्ण तपासले जातात. दवाखान्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ अशी आहे. ढोबळमानाने जर विचार केल्यास, क्लिनिकमध्ये २४० मिनिटांत ५३३ रुग्णांची तपासले जातात, तर याचा अर्थ असा आहे की त्यांनी फक्त अर्ध्या मिनिटासाठी रुग्ण पाहिला.”
दरम्यान, केजरीवाल सरकारने सांगितले की, केंद्राने नियुक्त केलेले आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी डायग्नोस्टिक लॅबवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार आहेत. तसेच,“जेव्हा कोणी चुकीचा फोन नंबर देतो तेव्हा ते तपासण्याचे हे अधिकार्यांचे असते,” असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले.
प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार:
• रुग्णांच्या मोबाईल क्रमांकामध्ये फक्त ० अंकाचा आहे = ११,६५७
• मोबाईल क्रमांकाच्या नोंदी रिकाम्या आहेत = ८२५१ नोंदी
• रुग्णांच्या मोबाईल क्रमांक ९९९९९ ९९९९९ ह्या रूपात नोंद केला आहे = ३०९२ नोंदी
• १ २, ३, ४, ५ ह्या अंकावरून सुरु न होणारे मोबाइलला क्रमांक (जे भारतात अस्तित्व न ठेवणारे ) = ४०० नोंदी
• १५ किंवा त्याहून जास्त वेळा पुनरावृत्ती झालेला मोबाइल क्रमांक = ९९९ नोंदी