लोकसभा व राज्यसभेच्या विशेषाधिकार समित्यांची पुढील आठवड्यात बैठक

निलंबित खासदारांची सुनावणी

नवी दिल्ली:- लोकसभा आणि राज्यसभेच्या विशेषाधिकार समित्यांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. ह्या बैठकीत १४ विरोधी खासदारांना संसदेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अनियंत्रित वर्तनासाठी निलंबनाच्या मुद्द्यावर त्यांचे मत मांडण्याची संधी दिली जाईल.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेतील १०० आणि राज्यसभेतील ४६ खासदारांना संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याच्या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याची मागणी करणारे फलक घेऊन घोषणाबाजी केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.

१८ डिसेंबर रोजी सदर सभागृहात “गंभीर अव्यवस्था” निर्माण केल्याबद्दल लोकसभेचे तीन व राज्यसभेचे अकरा खासदार निलंबित करण्यात आले. त्यामुळे खासदारांना निलंबित केल्याचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवले आहे.

You cannot copy content of this page