गिरणी कामगारांच्या घरासंबधीच्या अडचणी सोडवू! – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

मुंबई (भाई चव्हाण यांजकडून) “केंद्राच्या स्वच्छ भारत या संकल्पनेनुसार झोपडपट्टी मुक्त मुंबई या योजनेतून गिरणी कामगारांना शिवडी-मुंबई येथे सात हजार घरे माफक किमंतीत देण्याची योजना लक्षणीय आहे. ही योजना पुर्णत्वास आणण्यामध्ये येणारे अडचणी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय ‌पातळीवर सोडविण्यासाठी प्रयत्न करु!” असे आश्वासन केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी दिले.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले यांच्यासोबत गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश नाईक, सम्राट अशोक टुरिझम अॕड इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष अशोक कदम, संचालक कुणाल कदम, आदित्य कदम, शिवसंग्राम संघटनेचे राज्य चिटणीस हिंदुराव जाधव यांच्या उपस्थितीत शिवडी येथील नियोजित गिरणी कामगारांच्या घरासंबधी बैठक झाली. त्यावेळी आठवले यांनी हे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे आय ए एस अधिकारी, तसेच मुबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी, संबंधित खात्यांचे अधिकारी व आरपीआय ( आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विलास तायडे, कोषाध्यक्ष दिपक कदम, मनोहर आंग्रे, विश्वस्त बापू बागडी .कार्यकर्ते मुरली मुळे. आनंदा दोरूगडे,पांडुरंग पाटील, हेमंत दाभोळकर, पुंडलिक इस्वलकर, डॉ. शंकर सामल्ला, बाळासाहेब मेंगाने, रामचंद्र कळंबे, शशिकांत पाटील, आत्माराम गावकर, कमल काटकर, कांता गायकवाड, कर्मचारी वर्ग सौ. निता पवार,  सौ. निशा म्हाप्रळकर आदी आढावा बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीत अशोक कदम यांनी पिपिपि तत्वावर आधारीत मेक इन इंडिया टुरिझम, झोपडपट्टी मुक्त मुबई, रोजगारयुक्त मुंबई, परवडणारी घरे, स्वच्छ भारत या संकलपनेवर आधारीत शिवडी वडाळा येथील सर्वे नं.6 व 83 या 30 एकर जागेच्या संदर्भात पूर्ण माहिती आठवले यांना करून दिली. तसेच शासनाच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे जागेच्या हस्तांतरणास विलंब होत आहे; हे निदर्शनास आणून दिले.

या संदर्भात आठवले यांनी अधिकारी वर्गांचे मत जाणून घेतले. अडचणी संबंधात अशोक कदम यांच्याबरोबर विचार विनिमय केला. मुंबई जिल्हाधिकारी, तसेच अन्य अधिकाऱ्यांना सूचना केल्या. केंद्रीय पातळीवरील अडचणी दूर करु. तसेच या कामाला गती द्यावी, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली.