मॅग्नेटिक थेरपीमुळे ९९ टक्के आजारांपासून मुक्तता! -भाई चव्हाण

कणकवली:- चराचर सजिव सृष्टीला जिवंत रहाण्यासाठी ऑक्सिजनप्रमाणे पृथ्वीच्या गाभ्यातून निर्माण होणाऱ्या मॅग्नेटिक पाॅवरचीही नितांत आवश्यकता असते. किंबहुना पृथ्वी या एकमेव ग्रहातून निर्माण होणाऱ्या मॅग्नेटिक पाॅवरमुळेच आपल्या चराचर सृष्टीचे अस्तित्व टिकून आहे. मात्र गेल्या शंभर वर्षांत मानवाने विकासाच्या नावाखाली पृथ्वीवर सरासरी ३ चौ. फुटामध्ये लोखंडाचा अमाप वापर केल्याने हे लोखंडच चराचर सृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. कारण मॅग्नेटिंक पाॅवरच मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्याच्या लोखंडाच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे सद्या मानवासह चराचर सृष्टीला अपेक्षित प्रमाणात मॅग्नेटिंक पाॅवर मिळत नाही. परिणामी रक्ताभिसरण चेतासंस्थेतील बिघाडामुळे ९९ टक्के आजारांना निमंत्रण मिळते, अशी शास्त्रीय माहिती आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार भाई गणपत चव्हाण यांनी विविध शैक्षणिक संस्थांतील शाळा-महाविद्यालयांमध्ये दिले.

केंद्रीय आयुष मंत्रालय आणि केंद्रीय एम. एस. एम. ई. मंत्रालयाने नॅचोरोथेरपी म्हणून मॅग्नेटिक थेरपीला अलिकडेच मान्यता दिली आहे. या थेरपीद्वारे पिण्याचे पाणीही मॅग्नेटिक पाॅवरममुळे चार्ज होते. मोबाईलच्या खतरनाक रेडिएशन पासूनही मुक्तता मिळते. या पार्श्वभूमीवर पृथ्वीच्या वातावरणातील या मॅग्नेटिक पाॅवरच्या महत्वाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ई-बायोटोरिअम या “स्टार्ट अप” उद्योगाच्या सहकार्याने शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यासाठी शास्त्रीय माहिती आणि लाईव्ह डेमो आयोजित करण्यात येत आहेत. कणकवली महाविद्यालय, विद्यामंदिर, एस. एम. हायस्कूल, तसेच सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविद्यालय या ठिकाणी हे कार्यक्रम झालेत. त्यावेळी चव्हाण बोलत होते.

यावेळी कणकवली महाविद्यालयाचे प्रि. राजेंद्र चौगुले, प्रा. अरुण चव्हाण, प्रा. विजय सावंत, प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. सौ. वनिता शशीकांत सावंत आदी शिक्षक, विद्यामंदिरचे प्रा. पी. जे. कांबळे, प्रा. वनवे, प्रसाद राणे, सौ. श्रद्धा कदम, वैदंती विकास तायशेटे आदी, एस. एम. हायस्कूलचे सचिव डी. एम. नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक ए्. जी. पोतदार, पी. व्ही. कांबळे, श्रीकांत बाक्रे आदी शिक्षकवर्ग, तसेच सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविद्यालयाचे उपप्राचार्य गणपत शिरोडकर यांच्यासह प्राध्यापक वर्ग आणि कार्यालययीन कर्मचारी, पुरुषोत्तम राऊळ आदी उपस्थित होते.

यासंदर्भात अधिक माहिती देताना चव्हाण म्हणाले, पृथ्वी २४ तासात स्वतःभोवती १ लाख १० हजार कि. मी. प्रति तास या प्रचंड वेगाने फिरत असते. त्यावेळी पृथ्वीच्या गाभ्यातील ६ हजार सेल्सिअस तापामानामुळे वितळलेले लोखंड घुसळले जाते. या प्रक्रियेतून मॅग्नेटिंक पाॅवर निर्माण होते. ती पृथ्वीचे तीन स्तर भेदून वातावरणात येते. मात्र पृथ्वीवर मानवाने निर्माण केलेल्या लोखंडाच्या अगणित उत्पादनांमुळे ही पाॅवर लोखंड प्रचंड प्रमाणात शोषून घेते. पर्यायाने आता मानवासह चराचर सृष्टीला अपेक्षित मिळत नाही. मोबाईलमधील प्ले स्टोअर मधून मॅग्नेटिक पाॅवर दाखविणारा “गाॅस” (gauss) मिटर डाऊनलोड केल्यास ती मोजता येते.

चुंबकीय चिकित्सा ही प्राचिन भारतातील पर्यायी उपचारपद्धती म्हणून ओळखली जाते. रामायण आणि महाभारत या ग्रंथांमध्ये तिचा उल्लेख आहे, अशी माहिती देऊन ते म्हणाले, जगभरातील दिड हजारांहून अधिक शास्त्रज्ञांनी या चिकित्सेवर बायो आणि नॅनो सायंटिफिक टेक्नॉलॉजी द्वारे संशोधन केले आहे. मात्र जगातील फक्त तीनच देश या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पृथ्वीच्या पोटातून सुमारे ८०० कि. मी. खोलीतून घनदाट मॅग्नेटिंक पाॅवर असलेले लोखंड मायनिंगद्धारे काढतात. त्याची पावडर बनवून त्यावर बायो आणि नॅनो टेक्नॉलॉजी द्वारे प्रक्रिया करून अति उच्च क्षमतेचे नैसर्गिक मॅग्नेट चिप तयार केले जातात. मानवी जीवनासह चराचर सृष्टीला ते वरदान ठरले आहेत. याच नॅचरल मॅग्नेट चिपच्या संशोधनावर गेली १५ वर्षें अभ्यास करून मुंबईतील ई-बायोटोरिअमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर जोशी यांनी मानवासह प्राणीमात्रांच्या शरिराला आणि शेती-बागायतीचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने अपेक्षित मॅग्नेटिंक पाॅवर सतत मि‌ळत राहील अशी शास्त्रीय प्रोडक्ट निर्माण केली आहेत.

आपल्या शरिरातील रक्तामध्ये लोह असतो. हा लोह जमिनीतून येणारी मॅग्नेटिंक पाॅवर शोषून घेतो. ती पुरेश्या प्रमाणात मिळाली तरच लोहाची ताकद वाढते. त्यामुळे रक्ताभिसरण चेतासंस्था सुरळीत चालते. पेशी आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन शोषून घेतात. त्यामुळे ऑक्सिजनची लेवल अपेक्षित रहाते. ह्रदयाचे रक्त शुद्धीकरणाचे काम अपेक्षेप्रमाणे चालते. पर्यायाने सुरळीत रक्ताभिसरणाद्धारे शरिरातील अगणित प्रकारच्या पेशीसह इंद्रीयांना त्याच्या गरजेप्रमाणे रक्त पुरवठा होतो.याचा एकत्रित परिणाम म्हणून रोगप्रतिकारक शक्ति वाढते. परिणामी शरिरातील आजार औषधोपचारांसह लवकर बरे होण्यासह भविष्यकालीन आजारांपासून वाचता येते, अशी माहिती देऊन ते म्हणाले, लोखंडाच्या अतिरिक्त वापरामुळे हे लोखंड नैसर्गिक गुणधर्मामुळे ही मॅग्नेटिंक पाॅवर मोठ्या प्रमाणात शोषून घेते. पर्यायाने आपल्या शरिरातील लोहाला अपेक्षित मॅग्नेटिंक पाॅवर मिळत नाही. त्यामुळे रक्ताभिसरण संस्था कमकुवत होते. परिणामी ऑक्सिजन लेवल कमी होते. ह्रदयाचे रक्त शुद्धीकरणाचे काम मंदावते. इंद्रियांना आवश्यक रक्त पुरवठा होत नाही. इंद्रियांच्या अगणित पेशी कमजोर अथवा मरतात. त्यामुळे शरिरातील ९९ टक्के आजारांना निमंत्रण मिळते. मात्र या परिस्थितीत प्रत्येकाने बायो नॅनो मॅग्नेटिंक पाॅवरची प्रोडक्ट्स वापरल्यास अपेक्षित मॅग्नेटिंक पाॅवर सातत्याने शरिराला मिळत राहिल्याने आजारांपासून मुक्तता मिळण्यासह मोबाईलच्या खतरनाक रेडिएशन पासूनही मुक्तता मिळते.

विशेष म्हणजे ही सर्वं प्राॅडक्टस वापरकर्त्यांनी प्रथम स्वअनुभवातून इतरांना सांगून दिल्यास हा स्टार्ट अप उद्योग संबंधितांना आकर्षक उत्पन्नाचे साधनही देतो. त्यामुळे बेरोजगारांना एक स्वयंम रोजगाराची संधीही लाभते, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

या संदर्भातील सादरीकरणासह लाईव्ह डेमोसाठी वैयक्तिकसह शैक्षणिक, सामाजिक आदी संस्थांनी ९४२२३८१९९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री चव्हाण यांनी केले आहे.