लोकसभा निवडणूक २०१९- तिसऱ्या टप्प्यात देशात सरासरी ६३.२४ टक्के मतदान
महाराष्ट्रात ५६.५७ टक्के मतदान, आतापर्यंत लोकसभेच्या ३०२ जागांवर मतदान
नवीदिल्ली:- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रासह १५ राज्यात मतदारांनी आपला हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडलं. १५ राज्यातील ११७ जागांवर सरासरी ६३.२४ टक्के मतदान झालं. तर महाराष्ट्रात ५६.५७ टक्के मतदान झालं. देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७९ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी १२ टक्के मतदान झालं.
लोकसभेच्या एकूण ५४५ जागांपैकी आतापर्यंत ३०२ जागांवर मतदान पार पडलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर ६९. ५ टक्के मतदान झालं होतं. दुसऱ्या टप्प्यात ९५ जागांवर ६९.४४ टक्के मतदान झालं होतं. तर तिसऱ्या टप्प्यात ११७ जागांवर ६४.६६ टक्के मतदान झालं आहे.