श्रीसाईधाम देवालयात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी!
मुंबई (मोहन सावंत):- जोगेश्वरी पश्चिम येथील पाटलीपुत्र नगर मधील कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोशिएशनच्या आवारातील श्री साईधाम देवालयात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने अनेक आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्व रहिवाशांनी सहभाग घेऊन साईंच्या दर्शनाचा लाभ घेतला.
विशेष म्हणजे महाशिवरात्री निमित्ताने जयश्रीताई चंपानेरकर यांनी श्री शिवपुराणाचे पाच वेळा पठण करून त्याची सांगता विधिवत पूजा आणि होम हवनाने मंदिरात केली. त्यावेळी संगिता कबीर, छाया जोशी, विजया बनसोडे आणि मुग्धा सावंत यांनी विशेष सहभाग घेतला. या शुभवेळी श्री साईनाथ महाराज मंदिरात अभिषेक व होमहवन करण्यात आले. अनेक रहिवासी बंधू भगिनींनी दर्शनासह प्रसादाचा लाभ घेतला. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी मंदिरातची साफसफाई करुन भव्य सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
जयश्रीताई चंपानेरकर , संगिता कबीर, छाया जोशी, विजया बनसोडे आणि मुग्धा सावंत यांनी महाशिवरात्री उत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.