अ. भा. मराठा महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न

मुंबई (मोहन सावंत):- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ आज ११ वाजता गिरगाव, प्रार्थनासमाज येथे मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय पाटील, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे, विशेष सरकारी वकील पद्मश्री ऍड: उज्वल निकम, मा आमदार भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय.शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार होते. या कार्यक्रमप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघ व अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.