मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि अवैधरित्या गर्भनिदान चाचणी विरोधात शासन कोणती कारवाई करते?
मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि अवैधरित्या गर्भनिदान चाचणी विरोधात शासन कोणती कारवाई करते? -आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांचा विधानसभेत प्रश्न
मुंबई (मोहन सावंत):- राज्यातील ज्वलंत आणि सामान्यांच्या समस्यांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून शासनाने लक्ष वेधून घेणाऱ्या अभ्यासू आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांनी आज एका गंभीर सामाजिक विषयावर प्रश्न विचारला.
महाराष्ट्र्रात मुलींचे प्रमाण कमी असून त्याबाबत शासन नेमकी काय उपाययोजना करते आहे? हा प्रश्न केवळ एका जिल्ह्याचा नसून तो संपूर्ण राज्याचा आहे. देशात एक हजार पुरुषांच्या मागे स्त्रियांची आकडेवारी १ हजार २० असताना राज्यात स्त्रियांचा आकडा ९२० आहे. राज्यात जिथे अवैधरित्या गर्भनिदान चाचणी केली जाते; त्यावर शासनाने कोणती कारवाई केली? असे अत्यंत महत्वाचे गंभीर प्रश्न विधानसभेत मांडून आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांनी आरोग्य मंत्र्यांकडून उत्तरं घेतली. एवढंच नाहीतर सदनातील इतर सदस्यांनी सुद्धा ह्या विषयावर सखोल चर्चा केली.
त्यासंदर्भात आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांनी विचारलेले प्रश्न त्यावर आरोग्यमंत्री यांनी दिलेले उत्तर पुढील व्हिडिओत पाहता येईल.