महाराष्ट्रात ६ लाखांहून अधिक लोक ‘होम क्वारंटाईन’

६१ हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई:- कोरोनाच्या ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ६१ हजार ७९३ रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६७ हजार ७०६ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ८७ हजार ४१९ नमुन्यांपैकी १ लाख ३५ हजार ७९६ नमुने पॉझिटिव्ह (१७.२४ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १ हजार १८२लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ९१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ६२ करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात मुंबई मनपा-२०, कल्याण डोंबिवली मनपा-१, उल्हासनगर मनपा-१, मीरा-भाईंदर मनपा-१३, पालघर-१, मालेगाव मनपा-८,पुणे-१, पुणे मनपा-९, पिंपरी-चिंचवड मनपा-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-३, लातूर-१, अकोला मनपा-२.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *