श्रीराम मंदिर उभारणीस मार्ग मोकळा! मशिदीसाठी पर्यायी जागा!! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल!!!

नवी दिल्ली:- संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय देऊन वादग्रस्त जागी श्रीराम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा केला असून मशिदीसाठी पर्यायी जागा देण्याचा आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने एक मताने हा निर्णय दिला असून ह्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. तसेच सर्व स्तरातून शांततेचं आवाहन करण्यात आले आहे.

श्रीराम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याची योजना केंद्र सरकारने तयार करावी आणि मशिदीसाठी पर्यायी जागा देण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश गोगोई यांच्यासह न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा खंडपीठात समावेश होता.

अनेक दशकांपासून रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद आता संपुष्टात आला आहे. वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याच्या निकालामुळे त्या जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे मशिदीसाठी अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. दरम्यान सुन्नी वक्फ बोर्डाकडून सदर निर्णयाचे स्वागत झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा सन्मान करतो, परंतु हा निकाल समाधानकार नसल्याचे मुस्लीम पक्षकारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. याबाबत नक्की काय करायचे? याबाबत विचारपूर्वक निर्णय घेतल्यानंतरच पुढील पाऊल उचलू असेही या पक्षकारांनी स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page