कणकवलीतील पटवर्धन चौक बनला पार्किंग चौक- प्रशासनाचे दुर्लक्ष

योग्य कार्यवाही करण्याची ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची आग्रही मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : पटवर्धन चौकात नेहमीच वाहनांची-माणसांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. ह्या चौकात सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहने बेशिस्तीने पार्किंग केली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते, पादचाऱ्यांना त्रास होतो आणि जीवघेण्या अपघाताचाची शक्यता नाकारता येत नाही. तरीही पोलीस आणि नगरपालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. ह्यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्याची ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची आग्रही मागणी केली आहे.

पटवर्धन चौक सध्या वाहनांचा पार्किंग चौक बनला आहे; येथे योग्य नियंत्रण असणे आवश्यक आहे. याची कणकवली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी तातडीने दखल घ्यावी आणि वाहतुक पोलिसांची संख्या वाढवून बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करावी; अशी आग्रही मागणी ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन-सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी केली आहे.

सध्या एकच वाहतूक पोलीस काम पाहत आहेत. पटवर्धन चौक तसेच नेहमीच बेशिस्त पार्किंग असणारा आचरा रोड, बाजार पेठ, एस्.एम.हायस्कूल ते सह्याद्री हाँटेल अशा मोठ्या अतंरासाठी एकच वाहतूक पोलीस आपले काम चोखपणे करू शकत नाही. याची दखल पोलिसांनी आणि नगरपंचायत प्रशासनाने घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर हायवेच्या ब्रिजखाली ज्या ज्या ठिकाणी अंडरपास आहेत, त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग करून ठेवलेली असतात; त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी; अशीही मागणी करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page