कॉस्मोपॉलिटन असोशिएशनच्या मैदानाची दुरूस्ती कामाचा शुभारंभ आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या शुभहस्ते संपन्न

मुंबई:- पाटलीपुत्र नगर जोगेश्वरी (प.) येथील कॉस्मोपॉलिटन को. ऑप, हौसिंग सोसायटी असोशिएशनच्या श्री साईधाम देवालयाच्या बाजूच्या मोकळ्या मैदानाची दुरूस्ती व सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार मा. डॉ. श्रीमती भारतीताई लव्हेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

आमदार मा. डॉ. श्रीमती भारतीताई लव्हेकर यांच्या आर्थिक फंडातून सदर मैदानाची दुरूस्ती व सुशोभिकरण होणार आहे. यावेळी नगरसेवक योगिराज दाभाडकर, नगरसेविका रंजना पाटील, भाजपाचे मंडळ अध्यक्ष पंकज भावे, भाजपाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कॉस्मोपॉलिटन को. ऑप, हौसिंग सोसायटी असोशिएशनचे सेक्रेटरी श्री. मोहन सावंत यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यावेळी कॉस्मोपॉलिटन को. ऑप, हौसिंग सोसायटी असोशिएशनचे खजिनदार मुक्तार अहमद, चेतन नाईक, मंजू गुप्ता मॅडम, प्रकाश सोनाळकर, मुमताज इकरानी, संगिता कबीर मॅडम, सर्व इमारतीच्या सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सभासद, महिला, पुरूष व मुलं बहुसंख्येने उपस्थित होती.

कॉस्मोपॉलिटन को. ऑप, हौसिंग सोसायटी असोशिएशनतर्फे आमदार मा. डॉ. श्रीमती भारतीताई लव्हेकर, नगरसेवक योगिराज दाभाडकर, नगरसेविका रंजना पाटील आणि इतर उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

You cannot copy content of this page