अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांची शासन मान्यताप्राप्त जनसेवा वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट

मुंबई (मोहन सावंत):- जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी महापौर, `सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल चेंज’ या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख सल्लगार अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी शासन मान्यताप्राप्त मालाड पश्चिम येथे असलेल्या जनसेवा वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी तेथील वृद्धांशी आपुलकीने कन्येच्या नात्याने संवाद साधला. त्याचप्रमाणे तेथील व्यवस्थापनाची पाहणी केली. जनसेवा वृद्धाश्रम अनेक वर्षे वृद्धांची सेवा उत्कृष्ठरितीने करीत असून वृद्धाश्रमाला लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी दिले. तर व्यवस्थापनाने आणि वृद्धाश्रमातील वृद्धांनी अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांचे स्वागत केले. तेथील वृद्धांना त्यावेळी फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

त्यावेळची छायाचित्रे पुढीलप्रमाणे….