विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीची ७ जुलै रोजी दादरला जाहीर सभा!
तज्ञ विद्युत स्मार्ट मीटरचे भयंकर वास्तव सांगणार!
सभेस उपस्थित राहण्याचे मुंबईच्या माजी महापौर जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत प्रभावळकर यांचे आवाहन!
मुंबई (अजिंक्य सावंत)- विद्युत स्मार्ट मीटर योजना सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटात टाकणारी आणि कामगारांच्या नोकरीवर गदा आणणारी असून त्याबाबत वास्तव समजून सांगण्यासाठी विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीने जाहीर सभेचे आयोजन केले आहे. सदर सभा रविवार ७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृह, शारदा टॉकीज शेजारी, दादर पूर्व येथे होणार असून त्यावेळी त्या विषयातील तज्ञ- अनुभवी व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. सदर सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबईच्या माजी महापौर जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत प्रभावळकर यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विद्युत स्मार्ट मीटर ही शासनाने आणलेली योजना राज्यातील करोडो सर्वसामान्य जनतेला आर्थिक लूटमार करणारी ठरणार आहे. तसेच ग्राहकांचा मूलभूत अधिकार नाकारण्याबरोबर ठराविक भांडवलदारांचे हित साधणारी व कामगारांच्या नोकरीवर गदा आणणारी आहे. त्यामुळे विद्युत स्मार्ट मीटर योजनेची सविस्तर माहिती जनतेला हवी; यासाठी विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीने सभा आयोजित केलेली आहे. त्यावेळी या विषयातील तज्ञ व अनुभवी व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयात विद्युत स्मार्ट मीटर विरोधात जनहित याचिका दाखल करणारे विधिज्ञही उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. सदर सभेसाठी जनतेने सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबईच्या माजी महापौर जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत प्रभावळकर यांनी केले आहे.
सावधान! सावधान!! सावधान!!! ‘स्मार्ट विद्युत मीटर’चा राक्षस खाणार!
स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट; कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?