माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे आत्मचरित्र प्रकाशित

मुंबई:- माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणरावजी राणे साहेब यांचं आत्मचरित्र असलेल्या No Holds Barred (इंग्रजी) आणि झंझावात (मराठी) पुस्तकाचं प्रकाशन शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी मंत्रालय समोरील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील एका शानदार समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते झाले.

यावेळी सांस्कृतिक मंत्री मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, खासदार सुनील तटकरे, सौ. निलमताई नारायण राणे, मा. खा. निलेशजी राणे, आमदार नितेशजी राणे, दोन्ही पुस्तकांचे संपादक प्रिंयम मोदी, मधुकर भावे, राज्य सहकारी बँक अध्यक्ष विद्याधर अनास्कर, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वच राजकीय दिग्गजांनी नारायण राणेंसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी नेत्यांनी अनेक राजकीय किस्से देखील सांगितले.

You cannot copy content of this page