तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्या वतीने “रक्षा कृतज्ञता बंध” अनोखा सोहळा

णकवली:- डाॅ.अनिल नेरूरकर M.D. (अमेरिका) प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्यावतीने दरवषी प्रमाणे साजरा होणारा रक्षाबंधन सण यंदा अनोख्या पध्दतीने “रक्षा कृतज्ञता बंध” या उपक्रमाने यशस्वीपणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ ते २४ वर्षे वयोगटातील बालयुवा पिढीने स्व कौशल्यातून राखी बनवून सदरील राखी आपल्याच परिसरातील सामाजिक संस्थेचे कर्मचारी तसेच समाज्याच्या विविधांगांनी मदतीला धावून मदत करत असलेल्या सर्वसमान्य नागरीकांना ही राखी बांधून हा दिवस साजरा केला गेला.जिल्हास्तरावरील मुख्य कार्यक्रम तळेरे येथील तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरेच्या श्रावणी मदभावे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

या उपक्रमात वैभववाडी तालुक्यातील नाधवडे हायस्कूल नाधवडे, कणकवली तालुक्यातून तिवरे प्राथमिक शाळा, डांबरे प्राथमिक शाळा,विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालय तळेरे ,वामनराव महाडिक विद्यालय तळेरे ,ज्ञानप्रबोधिनी विद्यालय करुळ तसेच बांदा नं.१ केंद्रशाळा त्याचबरोबर जिल्ह्यातील अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे आणि वैशिष्टपूर्ण सहभाग लाभला. यात पन्नास विद्यार्थ्यांनी प्लास्टिक विरहित टाकाऊ वस्तूंपासून सुंदर आकर्षक राख्या बनविल्या होत्या.

तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्या वतीने तळेरे यराबविण्यात आलेल्या या अनोख्या “कृतज्ञता बंध सोहळा” सलग दोन दिवस राबविण्यात आला.कोरोना कालावधीत सामाजिक बांधिलकी स्वीकारून कोरोना योध्दा म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या डॉ.ऋचा कुलकर्णी,कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणोती इंगवले,डॉ. मनिषा नारकर, डाॅ.अभिजित कनसे, माजी सभापती दिलीप तळेकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, संतोष टक्के- वैभववाडी, सर्पमित्र-राजू वायंगणकर, लेखक-कवी प्रमोद कोयंडे, सदाशिव पांचाळ, पत्रलेखक व पत्रकार निकेत पावसकर, उदय दुधवडकर, युवा चित्रकार-अक्षय मेस्त्री, आण्णा खाडये, रिक्षा संघटना अध्यक्ष राजकुमार तळेकर, तळेरे रेशन दुकान चालक-निलेश सोरप, वीज महामंडळाचे वायरमन श्री.बंड, अॅम्बुलन्स चालक सचिन परब, प्राथमिक शिक्षक झाकिर शेख याचबरोबर समाजाप्रती कार्य करणाऱ्या अन्य व्यक्तींचा कृतज्ञता बंध बांधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. श्रावणी कॉम्प्युटरच्या संचालिका श्रावणी मदभावे व सतिश मदभावे, रिना दुधवडकर तसेच विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रत्येक उपक्रमात उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा नं.१ केंद्रशाळेचा नेहमीच हिरीरिने सहभाग असतो. या शाळेत तंबाखूविरोधी जनजागृती करणेसाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून जनजागृती करण्यात येत असते. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक विविध प्रकारच्या राख्या तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानानांही पोस्टाने राख्या पाठवल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना समाजात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या नागरिकांना राख्या बांधण्यात आल्या. कोरोना कालावधीत कोरोना योध्दा म्हणून उत्कृष्ट कार्य केलेल्या बांदा आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक राजन गवस सेवा निवृत्त शिक्षक वासुदेव कळंगुटकर आदी व्यक्तींना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमासाठी तिवरे मराठी शाळेचे श्री. कदम, नाधवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एस.पाटील, तळेरे हायस्कूलचे श्री. कानेकर, श्री. मांजरेकर सर, दळवी महाविद्यालयाचे प्रा. हेमंत महाडिक, श्री.शेट्ये, बांदा केंद्रशाळेचे जे.डी.पाटील तसेच विविध मान्यवर व विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

You cannot copy content of this page