सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र शिवाजीनगर पुणे- जुनं ते सोनं व मायेची ऊब सेवा

पुणे:- शहर व परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुठा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठी शिवाजीनगर मधील पाटील इस्टेट येथे राहणाऱ्या रहिवाश्यांचे प्रशासनाने स्थलांतर जवळच्या भारत इंग्लिश स्कुल व नरवीर तानाजी विद्या मंदिर येथील शाळामध्ये केले. अचानक ओढावलेल्या या संकटामुळे नागरिकांना अंगातील कपड्यानिशी बाहेर पडावे लागले; याची पाहणी सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र शिवाजीनगर पुणे केंद्रातील कार्यकर्त्यांनी सोमवारी मध्यरात्री पर्यंत केल्यानंतर मंगळवारी पहाटे पासून परमपूज्य अनिरुद्ध बापू यांच्या प्रेरणेने २००२ साली सुरू झालेल्या *जुनं ते सोनं* व *मायेची ऊब* या योजने अंतर्गत कपडे, भांडी व गोधड्या इत्यादी साहित्याचे वाटप अंदाजे २०० कुटुंबाना व ६०० लाभार्थींना करण्यात आले.

You cannot copy content of this page