नेहरू युवा केंद्र मार्फत किल्ले विजयदुर्ग येथे स्वच्छता अभियान

कणकवली (प्रतिनिधी):- युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्गच्या माध्यमातून विविध सामाजिक, युवक कौशल्य विकास केंद्री उपक्रम राबविले जातात. युवकांकडून राष्ट्र निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलावा या उद्देशाने युवकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. चांगल्या नागरिकत्वाची मूल्ये विकसित करणे हा मुख्य उद्देश. नेहरू युवा केंद्र देवगड यांनी किल्ले विजयदुर्ग येथे स्वच्छता श्रमदान अभियान आयोजित केले होते.

१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे.संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावातून स्वच्छता अभियान राबविले जात आहे. किल्ले परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. ४० किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. ग्रामपंचायत विजयदुर्ग सरपंच श्री.देवधर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दि. २२ ऑक्टोबर रोजी किल्ले विजयदुर्ग येथे स्वच्छता श्रमदान राबविले गेले.

यावेळी विजयदुर्ग किल्लेदार पुरातत्व विभाग मोहन कदम तसेच कर्मचारी यशपाल जैतापकर, समित मिठबावकर, रामदास घारकर, ग्रामपंचायत विजयदुर्ग लिपिक दिपक करंजे, ग्रामपंचायत कर्मचारी अमित डोंगरे, सफाई कामगार शंतनु ठुकरुल, सामाजिक कार्यकर्त्या गीता लळीत आणि नेहरू युवा केंद्र, देवगड तालुका समन्वयक रीना दुदवडकर यांनी स्वच्छता श्रमदान केले.

स्वच्छता मोहीम ही प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यांचे होणारे दुष्परिणाम यावर विचार करत प्लॅस्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच प्लास्टिकला पर्यायी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करण्यास आवाहन करण्यात आले.

You cannot copy content of this page