महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर शपथ घेणार!

मुंबई:- आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीने सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला असून २८ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवतीर्थावर अर्थात शिवाजीपार्क येथे शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्यातील थेट मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणारे उद्धव ठाकरे हे पहिले नेते आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच अतिशय वेगवान धक्कादायक घडामोडी घडल्या आणि शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री लाभणार आहे. राज्यपालांकडे सत्ता सत्ता स्थापनेचा दावा महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी रात्री उशिरा केला असून लवकरच महाराष्ट्रात सत्ता स्थापन होईल.

महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेबाबत झालेल्या घडामोडीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली. प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ह्या तीन पक्षांनी महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली. त्या आघाडीच्या प्रमुखपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवड करून महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *