सिंधुदुर्ग- पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 31 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार दि. 31 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9.30 वाजता केसरी ता.सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव.

बुधवार दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून पिंगुळी ता. कुडाळकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता पिंगुळी येथे आगमन व श्री. अभयजी वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था यांची भेट. स्थळ:- सनातन आश्रम, पिंगुळी ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग. सकाळी 10.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ:- मराठा मंडळ हॉल, कुडाळ जि. सिंधुदुर्ग. दुपारी 1 वाजता कुडाळ येथून भरड, ता. मालवणकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता भरड, ता. मालवण येथे आगमन व गडकिल्ले माती संकलन कलश यात्रा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता राजकोट मालवण शिवपुतळा चौथरा गडकिल्ले माती अर्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 4 वाजता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रस्त्यांचा शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- चिंदर ता. मालवण जि. सिंधुदुर्ग .सायं. 5 वाजता परुळे ता. वेंगुर्लाकडे प्रयाण. सायं. 6 वाजता परुळे ता. वेंगुर्ला ग्रामपंचायत भेट व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 7 वाजता सिंधुदुर्ग येथून मनोहर विमानतळ (मोपा), गोवा विमानतळाकडे प्रयाण.