शास्त्रीय गायनात मुलांमध्ये सुमन गोसावी तर मुलींमधून स्वरांगी पाटील प्रथम

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कला उत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेत शास्त्रीय गायन प्रकारात कुडाळ तालुक्यातील एस.आर.पाटील ज्यु. कॉलेज पाट मधील मुलांमधून सुमन गोसावी तर कणकवली कॉलेजच्या स्वरांगी गोगटे ही मुलींमध्ये प्रथम आली असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य सुशिल शिवलकर यांनी दिली.

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, मंत्रालय, नवी दिल्ली व यांच्यामार्फत सन 2015-16 पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवितात. सन 2023-24 मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, तालवाद्य वादन, स्वरवाद्य वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपरिक लोकनृत्य, व्दिमितीय चित्र, विमितीय शिल्प व खेळणी तयार करणे व नाट्य (भूमिका अभिनय)या 10 कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. या कला उत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता नववी ते इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहभाग घेण्याबाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य सुशिल शिवलकर यांनी आवाहन केले होते.

जिल्हास्तर कला उत्सव स्पर्धा प्रत्यक्ष स्वरुपात आयोजन दि. 26 ऑक्टोबर 2023 रोजी न्यु इंग्लिशस्कुल कसाल ता. कुडाळ येथे करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण 178 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला.या जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर यांनी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हास्तरावर शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, तालवाद्य वादन, स्वरवाद्य वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, व्दिमितीय चित्र, त्रिमितीय शिल्प व खेळणी तयार करणे व नाट्य (भूमिका अभिनय) या 10 कला प्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट 1 मुलगा आणि 1 मुलगी असे दोन क्रमांक काढण्यात आले आहेत. या विद्यार्थी राज्यस्तरावर होणाऱ्या कला उत्सव स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत.

या स्पेर्धेमध्ये अतिशय अटीतटी एकापेक्षा एक सरस असे सादरीकरण विद्यार्थ्यानी केले. कला प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे प्रथम क्रमांक पुढीलप्रमाणे परिक्षकांनी जाहिर कले .

शास्त्रीय गायन- मुलांमध्ये प्रथम, सुमन सुनिल गोसावी, एस.आर.पाटील ज्यु.कॉलेज पाट, ता.कुडाळ. मुलींमध्ये प्रथम, स्वरांगी मिलिंद गोगटे, कणकवली कॉलेज, कणकवली. पारंपारिक गायन- मुलांमध्ये प्रथम

मंदार बापू नाईक, अणसूर पाल हायस्कूल, वेंगुर्ले. मुलींमध्ये प्रथम, सावरी रोहन कांबळे, शेठ म.ग.हायस्कूल, देवगड. शास्त्रीय नृत्य- मुलींमध्ये प्रथम, रिजा भालचंद्र भाडकर, मदर टेरेसा स्कूल, वेंगुर्ले. पारंपारिक नृत्य-

मुलांमध्ये प्रथम, अवधुत वैभव आचरेकर, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महा.कट्टा, ता. मालवण. मुलीमध्ये प्रथम, पूर्वा पंढरी मेस्त्री, कसाल हायस्कूल व ज्यु. कॉलेज कसाल, ता. कुडाळ. तालवाद्य वादन- मुलांमध्ये प्रथम, संतोष प्रमोद सुतार, कणकवली कॉलेज कणकवली. मुलींमध्ये प्रथम, श्रृतिका श्रीकृष्ण मोर्ये, एस. आर. पाटील ज्यु. कॉलेज पाट, ता. कुडाळ. स्वरवाद्य वादन- मुलांमध्ये प्रथम, विद्यार्थी मध्ये प्रथम पवन उमेश प्रभू, एस. आर. पाटील ज्यु. कॉलेज पाट, ता. कुडाळ. मुलीमध्ये प्रथम, आर्या अनिल मोसमकर, खारेपाटण हायस्कूल, ता. कणकवली. खेळणी तयार करणे- मुलांमध्ये प्रथम, देवांग रघुनाथ मेस्त्री, भगवती हायस्कूल, मुणगे, ता. देवगड. मुलींमध्ये प्रथम, सानिया अनिल कुडतरकर, वराडकर हाय. कनिष्ठ महा. कट्टा, ता. मालवण. द्विमितीय चित्र – मुलांमध्ये प्रथम, मिहिर महेंद्र कदम, न्यु शिवाजी ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स जांभवडे, ता. कुडाळ. मुलींमध्ये प्रथम, वैष्णवी तुळशीदास तावडे, पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी. त्रिमितीय चित्र- मुलांमध्ये प्रथम, मिथिल मंगेश आंगचेकर, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महा. कट्टा, ता. मालवण. मुलींमध्ये प्रथम, श्रेया समीर चांदरकर, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महा कट्टा, ता. मालवण. नाट्य ( भूमिका अभिनय)- मुलांमध्ये प्रथम, सार्थक नम्रता वाटवे, आर. पी. डी. हायस्कूल, सावतवाडी. मुलींमध्ये प्रथम, श्रावणी राजन आरोंदेकर, कुडाळ हायस्कूल, कुडाळ.

जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेस कोल्हापूर विभाग चे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी भेट देऊन समाधन व्यक्त केले. रेकॉर्ड ब्रेक विद्यार्थ्याबदल कौतुक केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुभाष चौगुले, न्यु इंग्लिशस्कूल कसाल हायस्कूलचे मुख्याध्यापक कुसगांवकर, माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे, विभाग प्रमुख राजेंद्र कांबळे, उपविभाग प्रमुख बी. एस कांबळे, डाएट मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तसेच कला प्रकारासाठी तज्ज्ञ परिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी न्यु इंग्लिशस्कूल, कसाल मधील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page