आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त अम्बिका आश्रमाचे विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न!
कॉस्मोपॉलिटन को-ऑपरेटिव्ह सोसायटी असोसिएशन आणि ओम साईधाम देवालय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त अम्बिका विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न!
मुंबई- आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्ताने पाटलीपुत्र नगर, जोगेश्वरी (पश्चिम) मुंबई, येथील कॉस्मोपॉलिटन को-ऑपरेटिव्ह सोसायटी असोसिएशन व ओम साईधाम देवालय समितीच्या संयुक्त विद्यमाने ‘जीवनातील योगांचे महत्त्व!’ ह्या विषयावर शिबिर संपन्न झाले. त्यावेळी अम्बिका आश्रमच्या योगशिक्षकांनी मार्गदर्शन केले.
ह्या शिबिराचा लाभ सोसायटीतील महिला व पुरुष सदस्यांनी घेतला. शिबिरात योगाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आणि ठराविक योगाचे प्रकार उपस्थितांकडून करून घेणयात आले. त्यावेळी अम्बिका आश्रमच्या योग शिक्षिका मुग्धा मोहन सावंत आणि सुप्रिया खर्डे यांनी मानवी जीवनात योगाचे महत्व सांगून नियमितपणे तज्ञ अनुभवी मार्गदर्शक योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रशिक्षण घेतल्यास जीवन सर्वांग सुंदर होते; असे प्रतिपादन केले.
योगाचे माहात्म्य समजून घेतल्यानंतर उपस्थितांनी नियमित प्रशिक्षण घेण्यात यावे अशी विनंती केली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद अम्बिका आश्रमाच्या योग्य शिक्षिकांनी दिला.