जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद : ३८५ स्पर्धकांचा सहभाग

संचिता पाटिल, आर्यन गोवेकर, अक्षता गुंजाळ विजेते

तळेरे, दि. २३:- तळेरे येथील “अक्षरोत्सव” परिवार, श्रावणी कंप्युटर्स तळेरे आणि मेधांश कंप्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत संचिता पाटिल, आर्यन गोवेकर, अक्षता गुंजाळ विजेते ठरले असून या विजेत्यांना विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.

शालेय मुलांना लेखनाची आवड निर्माण व्हावी, मोबाइल आणि संगणकावर फिरणार्या बोटांमध्ये पुन्हा एकदा पेन यावे. सुंदर हस्ताक्षराची सवय व्हावी, यासाठी गेल्यावर्षीपासून सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी तिनही गटात मिळून 385 स्पर्धकांनी सहभाग घेतला.

गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे…

इ. १ ली ते ४ थी:-
प्रथम क्रमांक- संचिता संभाजी पाटील (जिल्हा परिषद शाळा ओटव ओटववाडी),
व्दितीय क्रमांक- स्वरा अनिल ओतारी (श्री सातेरी जिल्हा परिषद केंद्रशाळा साटेली भेडशी),
तृतीय क्रमांक- पल्लवी रामचंद्र गोवेकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वजराट देवसू नं. २,
उत्तेजनार्थ- संचिता गजानन वेंगुर्लेकर, भगवान समीर विटेकर, वैशाली रामचंद्र गोवेकर (सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वजराट देवसू नं.२,
शंतनू जयदीप कराळे (जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१

इ. ५ वी ते ८ वी:-
प्रथम क्रमांक- आर्यन अरविंद गोवेकर (नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय),
व्दितीय क्रमांक- श्रेया प्रवीण कदम, तृतीय क्रमांक अनुश्री अभिजित राणे (दोन्हीही एस. एम. हायस्कूल कणकवली)
उत्तेजनार्थ क्रमांक- युवराज गुरुप्रसाद आजगांवकर (बॅ नाथ पै विद्यालय, कुडाळ), सुयश सदगुरु साटेलकर (एस. एल. देसाई विद्यालय, पाट), नेहा तुकाराम घोगळे, वैभवी दिपक वजराटकर (दोन्हीही नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय)

इ. ९ वी ते १२ वी:-
प्रथम क्रमांक- अक्षता मारुती गुंजाळ (कुडाळ हायस्कूल कुडाळ),
व्दितीय क्रमांक- प्रणव नीलकंठ सुतार (कणकवली कॉलेज कणकवली),
तृतीय क्रमांक- कृतिका लिलाधर रेडकर (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा)
उत्तेजनार्थ क्रमांक- महादेव राघोबा धुरी (रावसाहेब बा. म. कनिष्ठ महाविद्यालय, शिरोडा), मनाली मिलेश पवार (न्यू इग्लेश स्कूल उभादांडा), तृप्ति दशरथ सुतार (कोर्ले धालवली माध्यमिक विद्याले), लिना नारायण मांजरेकर (अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी), तिलोत्तमा अर्जुन शेलटे (गुरु अ. वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा)

या तिनही गटातील प्रथम तीन विजेत्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परिक्षण सुलेखनकार अभिजित राणे आणि कलाशिक्षक मंदार चोरगे यांनी केले. हा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम रविवारी २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनाला तळेरे येथील प्रज्ञांगण मध्ये सकाळी १० वा. होणार आहे. यावेळी चित्रकला स्पर्धेचाही बक्षिस वितरण होईल. या कार्यक्रमाला सर्व विजेत्या स्पर्धकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांचे “अक्षरोत्सव” परिवार, श्रावणी कंप्युटर्स तळेरे आणि मेधांश कंप्युटर्स कासार्डे यांच्यावतीने अभिनन्दन करण्यात आले.

You cannot copy content of this page