राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माजी महासंचालक व विद्यमान राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.

कार्यालयाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी श्रीमती अमरज्योत कौर अरोरा, लेखा अधिकारी निलेश केदारे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती श्री. कांबळे यांनी दिली. तसेच श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी महासंचालक पदावर असताना परिचय केंद्रात दहा वर्षापूर्वी भेट दिल्याचे सांगितले.

दिल्ली कार्यालयामार्फत होत असलेल्या कामांचे कौतूक करताना सुसज्ज ग्रंथालय, स्वच्छ कार्यालय, आयएसओ-9001 प्रमाणित व आधुनिक प्रसार माध्यमांचा वापर या सर्व बाबींमुळे दिल्लीचे माहिती व जनसंपर्क कार्यालय हे नावलौकिक कमवत आहे. महाराष्ट्र राज्याच्या सर्व उपाययोजनांची माहिती हे कार्यालय देत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच वाटचालीसाठी शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

You cannot copy content of this page