कोरोनावर लस बनविण्यास मिळाले यश, रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा
मॉस्को:- संपूर्ण जगात कोरोनावर लस शोधण्यासाठी संशोधक बरीच मेहनत घेत असून कोरोनावर लस बनविण्यास रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाला यश मिळाले आहे. सदर लस सर्व मानवी चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. असा रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने दावा केला आहे.
आजपर्यंत २१६ देशात सव्वा कोटी लोकांनां कोरोना विषाणूची बाधा झाली असून त्यामुळे साडेपाच लाखापेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे. संपूर्ण जग लॉकडाऊनचा अतिशय वाईट अनुभव घेत असताना कोरोनावर लस येणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी जगातील बहुतांशी देशातील संशोधक कोरोनावर लस निर्माण करण्यासाठी संशोधन करीत आहेत. त्यासंदर्भात दररोज नवनवीन बातम्या झळकतात. आता दिलासा देणारी बातमी आली असून कोरोनावर लस बनविण्यास रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाला यश मिळाले असून सदर लस सर्व मानवी चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे; असा रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने दावा केला.