बापू- एक भक्कम आधार!

आजचा दिवस कालचा व्हायला वेळ लागत नाही. क्षण हातातून निसटून जातात…..
पण निसटत्या क्षणांना आनंदाच्या कवचाने लपेटून ते हृदयात बंदिस्त करता येतात.
काळानुरूप पुढे पुढे प्रत्येकालाच सरकायचे आहे. पण पुढे जाताना परमात्मा अनिरुद्धाने बोट पकडले की काळ सुवर्णक्षणांनी भारून जातो.

बापू म्हणजे एक जादुई व्यक्तीमत्व…… कॄष्णाच्या बासरीने जसे गायी, वासरे, पक्षी, अगदी झाडेही स्तब्ध व्हायची; तसे बापूंच्या बोलण्याने मन प्रसन्न होते, आधार मिळतो आणि मनातल्या प्रश्नांना सहजरीत्या उत्तर मिळत जातात.

बापूंकडे आल्यामुळे आपली आध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारिरीक प्रगती घडत जाते.
जसे आपण मुलांवर संस्कार करत जातो; तसे बापूंच्या प्रत्येक प्रवचनातून आपल्यावर हे संस्कार केले जातात.

बापूंच्या कॄपेने आम्ही आनंदी आहोत. आमच्यासाठी चांगल्यात चांगले क्षण देण्याचा प्रयास बापू करत असतो. मी बापूंविषयी आमच्या परिचितांना सांगितले…..ये गं उपासनेला……. पण त्यांना वाटते काय ही कुणा बुवाच्या मागे लागली….. हे सगळे अनावश्यक आणि टाईमपासचे लक्षण असल्याचे त्यांचे मत…..

अनेक न सुटणारे प्रश्न आयुष्यात असतानाही केवळ अहंकार हेकेखोर वृत्ती किंवा आपल्याच कोषात स्वतःला बंदिस्त ठेवण्याची कोती वृत्ती यामुळे समोर आधारवड परमात्मा असतानाही त्यांच्या कृपेचा लाभ यांना घेता येत नाही.
किंवा
आम्ही या गुरूंचे करतो मग कशाला या उपासनेला यायचे?
पण हा सगुण रूपात अवतरलेला परमात्मा आहे. काळानुरुप संकटांची चाहूल जाणून घेऊन हा मार्गदर्शन करतो. त्यावर तातडीने उपायही सांगतो आणि आपले प्रश्न सहज सुटायला मदत करतो.

ज्यांच्या आयुष्यात बापू नाही त्यांच्या आयुष्यात छोटेसे प्रश्न ही उग्ररूप धारण करतात
आणि
ज्यांच्या आयुष्यात बापू आहेत त्यांच्या आयुष्यातले डोंगराएवढे प्रश्नही चुटकीसरशी बापूंच्या कृपेने सुटतात.

बापूंकडे आल्यावर काय मिळत नाही??

माझ्या प्रारब्धाशी लढण्यासाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी बापूंनी स्तोत्राचे, श्लोकाचे, उपासनेचे शस्त्र आमच्या हाती दिले आहे.
डिझास्टर मॅनेजमेंट कोर्स आणि ए. ए. डी. एम यांच्या अंतर्गत अनेक सेवांमुळे आपले सामाजिक संबंध दृढ होतात.
बोन्साय स्पोर्ट्स, सूर्यनमस्कार… यामुळे माझी शारीरिक क्षमता वाढते आणि आरोग्य चांगले राहते.
समर्पनाची भावना मनात वाढली ना की श्रध्दा बळकट होत जाते आणि श्रद्धेमुळे विश्वास वाढत जातो. या प्रेमाच्या साखळीने त्यांच्या चरणांशी स्वतःला घट्ट बांधून ठेवल्यामुळे मन षडरिपुंच्या पाठीमागे भरकटत नाही.

जशी वाऱ्याची झुळूक स्पर्शून गेले की स्पर्श जाणवतो; पण ती झुळूक मात्र दिसत नाही. तसेच बापूंच्या कृपेचे पडसाद सतत माझ्या आयुष्यात मला जाणवत असतात.

आजकाल लोकांना अध्यात्मासाठी वेळ नसतो. आजारी पडल्यामुळे दवाखान्यात जाण्यास वेळ असतो; पण आजारी पडू नये म्हणून उपासनेचे चार्जर वापरायला वेळ नसतो.

सहज सोप्या मार्गावर विश्वास नसतो .अवघड खाचखळग्यांची आणि खर्चिक मार्ग आजकाल लोकं स्टेटस जपण्यासाठी अवलंबतात.

आपला खऱा मार्गदर्शक, सच्चा मित्र म्हणजे अनिरुद्ध….
आपल्या शारीरिक-मानसिक स्थितीचा डॉक्टर म्हणजे अनिरुद्ध….
आपले प्रेमळ आई बाबा म्हणजे अनिरुद्ध नंदाई…..
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे अनिरुद्ध…..
मग एवढी मोठी बंपर ऑफर जर आपल्याला ह्या अनिरुद्ध उपासनेमुळे मिळत असेल तर का नाही मी माझ्या आयुष्यातला काही काळ उपासनेसाठी द्यायचा???

मुलांचे शिक्षण, आजारपण, नोकरी, मुलांची लग्न, घरादाराचे नोकरीचे अनेक प्रश्न आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आ वासून उभे आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तर फक्त आणि फक्त अनिरुद्ध उपासनेतून सुटू शकतात. म्हणूनच आपल्या जवळच्या आप्तांनी उपासनेला यावे; अशी कळकळ असते. त्यांचे प्रश्नही सुटावेत म्हणूनच आपण त्यांना सतत `उपासनेला या’ असं सांगत असतो बाकी काय…

जे आले ते तरुनी गेले…..
जे नं आले ते तसेच राहिले……
तसेची राहिले…

मी अंबज्ञ आहे
आम्ही अंबज्ञ आहोत

जय जगदंब जय दुर्गे
नाथसंविध् नाथसंविध् नाथसंविध्

 

-सुनितावीरा बडवे
औरंगाबाद

 

You cannot copy content of this page