अकरावीची सीईटी २१ ऑगस्टला होणार!
मुंबई:- दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीला विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी द्यावी लागणारी प्रवेश (CET) परीक्षा आज जाहीर झाली असून २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत ही परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना २० जुलै २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून २६ जुलैपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. सीईटीच्या आधारेच विद्यार्थ्यांना विविध नामांकीत महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार असून त्यातून रिक्त राहिलेले प्रवेश दहावीच्या मार्कांवर आधारित असतील. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना सदर CET परीक्षा महत्वाची ठरणार आहे.
महत्वाचे…
१) ऑनलाईन अर्ज- ऑनलाईन हॉल तिकीट.
२) १०० गुणांची परीक्षा व बहुपर्यायी प्रश्न.
३) ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा. परिक्षेसाठी दोन तासांचा अवधी.
४) राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न.