मजूर सहकारी संस्थांच्या बळकटीसाठी शासन सकारात्मक!

मुंबई ( युवराज डामरे ):- मजूर सहकारी संस्थांच्या अनेक समस्यांबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मजूर सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई कोकण विभागीय मजूर सहकारी फेडरेशनच्या विनंती पत्रानुसार विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या समवेत संयुक्त सभा घेतली. त्यावेळी मजूर सहकारी संस्थांच्या अनेक समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. मजूर सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले.

error: Content is protected !!