राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर
मलेरिया, डेंग्यूला आळा घालण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे काम हाती घ्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनाच्या १७ लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई:- राज्यात आज ६४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९८९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४० हजार ०९२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ नमुन्यांपैकी ३ लाख ४७ हजार ५०२ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ७४ हजार २६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २९८ मृत्यू हे मुंबई मनपा-५५, ठाणे-७, ठाणे मनपा-१, नवी मुंबई मनपा-७,कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर-२, वसई-विरार मनपा-२३, पालघर-२,रायगड-३, नाशिक-५, नाशिक मनपा-८, मालेगाव मनपा-२, अहमदनगर-१, धुळे मनपा-२, जळगाव-८, जळगाव मनपा-५, पुणे-१९, पुणे मनपा-३७, पिंपरी-चिंचवड मनपा-२२,सोलापूर-१, सोलापूर मनपा-२, सातारा-१, कोल्हापूर-३, कोल्हापूर मनपा-१, सांगली-२, सांगली मिरज कुपवाड मनपा-३, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-१०, जालना-३, हिंगोली-४, परभणी मनपा-१, लातूर-५, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, बीड-३, नांदेड मनपा-४, अकोला-१, अमरावती मनपा-२,यवतमाळ-२, नागपूर मनपा-१, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य ६ अशी नोंद आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (१,०५,९२३) बरे झालेले रुग्ण- (७७,१०२), मृत्यू- (५९३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९३), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,५९८)
ठाणे: बाधित रुग्ण- (८१,७०८), बरे झालेले रुग्ण- (४२,६५७), मृत्यू- (२१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६,८५७)
पालघर: बाधित रुग्ण- (१३,१९४), बरे झालेले रुग्ण- (७४४९), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४६२)
रायगड: बाधित रुग्ण- (१३,१२५), बरे झालेले रुग्ण-(७३९९), मृत्यू- (२४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४८१)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१३९२), बरे झालेले रुग्ण- (७५५), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९०)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२९५), बरे झालेले रुग्ण- (२४४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)
पुणे: बाधित रुग्ण- (६६,५३८), बरे झालेले रुग्ण- (२३,५८९), मृत्यू- (१५९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,३५७)
सातारा: बाधित रुग्ण- (२७५४), बरे झालेले रुग्ण- (१५०८), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (११५२)
सांगली: बाधित रुग्ण- (११७९), बरे झालेले रुग्ण- (५५५), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२८४४), बरे झालेले रुग्ण- (१००४), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७८३)
सोलापूर: बाधित रुग्ण- (६९५०), बरे झालेले रुग्ण- (३०६०), मृत्यू- (४१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४७५)
नाशिक: बाधित रुग्ण- (११,३०१), बरे झालेले रुग्ण- (६१५४), मृत्यू- (३९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७४९)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (२४१६), बरे झालेले रुग्ण- (१०६६), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०५)
जळगाव: बाधित रुग्ण- (८५०१), बरे झालेले रुग्ण- (५६६२), मृत्यू- (४४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३९७)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (४७७), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५७)
धुळे: बाधित रुग्ण- (२२६२), बरे झालेले रुग्ण- (१४०६), मृत्यू- (८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७६)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१०,८९७), बरे झालेले रुग्ण- (५७७९), मृत्यू- (४२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६९२)
जालना: बाधित रुग्ण- (१५७८), बरे झालेले रुग्ण- (६८१), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३६)
बीड: बाधित रुग्ण- (४६२), बरे झालेले रुग्ण- (१८१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२६९)
लातूर: बाधित रुग्ण- (१२६७), बरे झालेले रुग्ण- (६२१), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७८)
परभणी: बाधित रुग्ण- (४१८), बरे झालेले रुग्ण- (१७८), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६)
हिंगोली: बाधित रुग्ण- (४७४), बरे झालेले रुग्ण- (३२२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)
नांदेड: बाधित रुग्ण- (१०९९), बरे झालेले रुग्ण (४९९), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५४)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५९३), बरे झालेले रुग्ण- (३६९), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)
अमरावती: बाधित रुग्ण- (१४८६), बरे झालेले रुग्ण- (१००८), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२८)
अकोला: बाधित रुग्ण- (२२५०), बरे झालेले रुग्ण- (१७१९), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२७)
वाशिम: बाधित रुग्ण- (४३६), बरे झालेले रुग्ण- (२०२), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (७९५), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३६)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (६५७), बरे झालेले रुग्ण- (४२६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९)
नागपूर: बाधित रुग्ण- (२९२९), बरे झालेले रुग्ण- (१४९७), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३९३)
वर्धा: बाधित रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (४२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)
भंडारा: बाधित रुग्ण- (१९१), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२)
गोंदिया: बाधित रुग्ण- (२३२), बरे झालेले रुग्ण- (२१०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२६६), बरे झालेले रुग्ण- (१७९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (२१३), बरे झालेले रुग्ण- (१२९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३०२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६०)
एकूण: बाधित रुग्ण-(३,४७,५०२) बरे झालेले रुग्ण-(१,९४,२५३), मृत्यू- (१२,८५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०३),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४०,०९२)
(टीप:ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)