प्रेमळ स्वभावाचे राजेश धुरी यांचे दुःखद निधन
कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली शहरातील धुरी ड्रायव्हिंग स्कूलचे मालक राजेश धुरी यांचे आज दुपारी ओरोस येथील इस्पितळात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. राजेश धुरी यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
राजेश धुरी हे प्रेमळ स्वभावाचे होते. ते नेहमीच सर्वांना सहकार्य करायचे. त्यामुळे त्यांचा खूप मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या आत्म्यास परमात्म्याचरणी चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो; ही प्रार्थना! त्यांना पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!