वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना आणि झुलता पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलता पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,अधिक्षक अभियंता छाया नाईक,कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपविभागीय अभियंता संजय दहिफळे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, नागरिक व पर्यटक उपस्थित होते. माझा वेंगुर्ला पतंग महोत्सवाचे उद्घाटनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.