तळेरे येथील अक्षरघराला मान्यवरांच्या भेटी: अक्षर घर या संकल्पनेचे कौतुक

तळेरे:- तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. या दरम्यान अक्षर घर या संकल्पनेचे प्रचंड कौतुक केले. यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज आणि वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, उपक्रमशिल शिक्षक युवराज पचकर आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, सुप्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार डॉ. संदिप डाकवे यांचा समावेश आहे.

उपक्रमशील शिक्षक युवराज पचकर यांनी संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

नरवीर तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज आणि वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला भेट दिली. यावेळी म्हणाले की, 1982 पासून अमरहिंद मंड़ळात श्रवणभक्तिला सुरुवात केली. ती आजतागायत सुरु आहे. या दरम्यानच्या काळात सर्वच क्षेत्रातील भव्य दिव्य माणसांना ऐकता आले, भेटता आले. त्या व्यक्ती मला पुन्हा तळेरेच्या घरी तुमच्या ‘छंद वहीत’ सापडल्या. यामुळे आठवणी जाग्या झाल्या, आनंद देऊन गेल्या. मन आणि आठवणी पुन्हा भूतकाळात घेवून गेल्या याचे श्रेय तुमच्या छंदोपासनेला असल्याचे सांगितले.

सातारा येथील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, सुप्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार डॉ. संदिप डाकवे यांनी संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला भेट देऊन त्यांच्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

तर उपक्रमशील शिक्षक युवराज पचकर यांनी अक्षरघराला भेट देत. निकेत पावसकर यांना फेटा बांधून शुभेच्छा पत्र दिले. तर सातारा येथील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, सुप्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार डॉ. संदिप डाकवे यांनीही या अक्षर घराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्राचार्य सुनील ढेंबरे, छायाचित्रकार अनिल देसाई, सुशांत तुपे, आशिष वीर, विजय सवादेकर, तेजस बोर्गे, अभिजीत गायकवाड, ऋषिकेश माळी आदी उपस्थीत होते.

यावेळी त्यांनी संपुर्ण संग्रह पाहिला, या संग्रहामागील कल्पना जाणुन घेतली. यावेळी बोलताना डॉ. संदीप डाकवे म्हनाले की, आपला संग्रह पाहुन मन तृप्त झाले. आपल्या संग्रहाचे कला दालनात रुपांतर झालेले पहायला नक्की आवडेल, अशी आशा व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. तसेच, यावेळी निकेत पावसकर यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

अक्षरघराला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी दिली भेट…
तळेरे येथील अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, फुटबॉल खेळाडू जयेश राणे, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, दिग्दर्शक दिपक कदम, अभिनेत्री अक्षता अनिल कांबळी, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कान्बळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, कवी प्रा. प्रदिप पाटिल, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, इस्लामपुरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, चित्रकार राज शिंगे, लेखक धीरज वाटेकर, जीवन प्रबोधनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर, महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे विजय घरत, घुंगुरकाठीचे संस्थापक सतिश आणि सौ. सई लळीत, माजी राष्ट्रपतींचे स्वीय सहाय्यक विनायक दळवी यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे.