अ‍ॅपद्वारे लोन घेताय? बदनामीसह आत्महत्या करण्यास भाग पाडतील…

वाढती बेरोजगारी, वाढते खर्च, वाढती महागाई, वाढत वैद्यकीय खर्च, अशाश्वत उत्पन्न ह्यामुळे बचत होत नाही. त्यामुळे कधीकधी छोट्या मोठ्या रक्कमेची नितांत गरज पडते आणि असे ग्राहक अगदी सहजपणे लोन अ‍ॅपच्या चक्रह्युवात अडकतात. एकदा का गरजु लोन अ‍ॅपच्या चक्रह्युवात अडकला की त्यातून त्याची सुटका होणं खूप कठीण होऊन जातं. १०-२० हजाराचे लोन फेडण्यासाठी दुसऱ्या कंपनीच्या अ‍ॅपद्वारे लोन घेतलं जात. मग तिसरे…. चौथे….. मग वसुली एजंटचे फोन, त्यांच्या धमक्या… बदनामी करण्यास सुरुवात… शेवटी आत्महत्या हाच एकमेव मार्ग असे समजून अनेकांनी आत्महत्या केली आहे. ह्या गंभीर मुद्द्यांकडे प्रत्येकाने पाहणे गरजेचे आहे. त्यावर bbc मराठीने एक शोध वृत्त प्रसिद्ध केले आहे. ते खालील लिंकवर क्लिक करून वाचू शकता…

https://www.bbc.com/marathi/articles/c517l9p39kzo