टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा! -राज ठाकरे

अन्यथा आम्ही महाराष्ट्रातले टोलनाके जाळून टाकू! राज ठाकरे यांचा गर्भित इशारा

ट्विटर आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनसेची भूमिका…

२ ऑक्टोबर २०२३
ठाणे-मुंबईच्या हद्दीवरच्या टोल पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘टोलमुक्त’ राज्य हे आश्वासन होतं, त्याचं काय झालं असं निवडणुका झाल्यावर विचारायचं नसतं असा सरकारचा एकूण आविर्भाव आहे. आणि ह्या टोलवाढीच्या विरोधात तुम्ही शांततेत आंदोलन केलंत तरी सरकार अटक करते कारण ही शांतता पण त्यांना सहन होत नाही. आज महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी सविनय आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना सरकारने अटक केली. का? तर टोलवाढ कसली हा प्रश्न विचारताय म्हणून.
https://x.com/mnsadhikrut/status/1708775990145483182?s=20

avinash jadhav @avinash_mns
२ ऑक्टोबर २०२३
टोलवाढ का केली? हा साधा प्रश्न सरकारला विचारून, महात्मा गांधी अभिप्रेत सविनय आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना ठाण्यातील मुख्यमंत्री असलेल्या सरकारच्या आदेशाने अटक..
असो, तरी पण ठाणेकरांवर होणाऱ्या अन्यायाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाचा फोडणार..
https://x.com/avinash_mns/status/1708791183907201118?s=20

avinash jadhav @avinash_mns
६ ऑक्टोबर २०२३
तात्काळ काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ठाणेकरांच्या प्रश्नासाठी वेळ नाही का? ठाण्यातील आमदार, खासदारांची हाताची घडी आणि तोंडावर बोट का? आम्ही लढतोय ठाणेकरांवर होणाऱ्या अन्यायासाठी, दैनदिन प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी..
https://x.com/avinash_mns/status/1710179229227212996?s=20

avinash jadhav @avinash_mns
टोलवाढी विरोधात आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस..
अनेक ठाणेकर आणि मुंबईकर आंदोलनस्थळी भेट देवून पाठिंबा दर्शवत आहेत.. बघू डोळे झाकलेली मांजर कधी इकडे लक्ष देते..
https://x.com/avinash_mns/status/1710528102642942204?s=20

८ ऑक्टोबर २०२३
संपूर्ण पत्रकार परिषद : मुंबईकरा आणि ठाणेकरांना न परवडणाऱ्या अवाजवी टोलधाडीविरोधात मनसे नेते श्री. अविनाश जाधव उपोषणावर; सन्मा. राजसाहेबांची भूमिका !
https://x.com/mnsadhikrut/status/1710923530727194755?s=20

टोलमुक्त महाराष्ट्र झाला देखील आणि महाराष्ट्राला कळलं देखील नाही… किती ‘भूल’थापा माराल. खरंच राजसाहेबांनी जे नाव ठेवलं होतं ते अगदी चपखल आहे… भाजपकुमार थापाडे !
https://x.com/mnsadhikrut/status/1711003021021450359?s=20

९ ऑक्टोबर २०२३
मुंबईतील ५ ठिकाणच्या टोलवाढीच्या विरोधात अविनाश जाधव आणि इतर महाराष्ट्र सैनिकांनी उपोषण सुरु केलं होतं. टोलच्या विरोधातील आमचं आंदोलन २०१०चं. मुळात टोलच्या पैशाचं काय होतं? त्याच कंपन्यांना टोलची कंत्राटं का मिळतात? इतका प्रचंड टोल भरून पण रस्ते अतिशय घाणेरड्या अवस्थेत आहेत. आणि तरीही कोणी का बोलत नाहीत?
https://x.com/mnsadhikrut/status/1711257420234690647?s=20

२०१० ला आम्ही टोलधाडीविरोधात आम्ही आंदोलन सुरु केलं. आमच्या आंदोलनानंतर अधिकृत आणि अनधिकृत असे ६७ टोल नाके बंद झाले. आणि ते टोलनाके आमच्या रेट्यामुळेच झाले. कुठल्याच सरकारच्या मनात टोल बंद करायची इच्छा नव्हती पण आमचा रेटा इतका होता की टोल बंद करावेच लागले.
https://x.com/mnsadhikrut/status/1711258285699903585?s=20

उद्धव ठाकरे ते देवेंद्र फडणवीस ते अजित पवार सगळ्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू अशी आश्वासनं दिली. पण तरीही टोल बंद होत नाही कारण ह्यात प्रत्येकाचं अर्थकारण सामील आहे. त्यामुळे रस्ते कितीही खराब असले तरीही हे सगळे राजकीय पक्ष कधीच टोल बंद होऊ देणार नाहीत. पण ह्यावर लोकं कधी ह्यावर जागृत होणार?
https://x.com/mnsadhikrut/status/1711259468774642074?s=20

देवेंद्र फडणवीस काल म्हणाले की राज्यात दुचाकी, तीन चाकी आणि किंवा चारचाकी वाहनांना टोल माफ आहेत. मग आजपर्यंत टोलच्या नावाखाली जमा होणारी रक्कम कुठे जमा होत आहे? एकतर राज्य सरकार खोटं बोलत आहेत किंवा टोल कंपन्या लूट करत आहेत. मी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि त्यांना सांगणार आहे की देवेंद्र फडणवीस म्हणालेत तसं दुचाकी तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना टोल माफ करा, आणि इतके दिवस जे पैसे गोळा झालेत तर ते कुठे गेले?
आणि इतकं होऊन पण जर टोल वसूल केला जाणार असेल तर माझे महाराष्ट्र सैनिक टोल नाक्यांवर उभे राहून वाहनांना सोडायला लावेल. आणि तरीही जर संघर्ष झाला तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. मग जे होईल ते होईल.
https://x.com/mnsadhikrut/status/1711260536367677890?s=20

टोलचा विषय, रस्त्यातील खड्ड्यांचा विषय हा काश्मिरइतका किचकट विषय आहे का? हा विषय इतकी वर्ष का सुटत नाही? रस्त्यातील खड्डे भरण्याची अवाढव्य रकमेची टेंडर्स कशी निघू शकतात? खड्डे भरण्याची टेंडर्स आपल्याकडेच निघतात. बाकी कुठेच घडत नाही. आणि हा विषय जर सरकारला सोडवता येत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू.
https://x.com/mnsadhikrut/status/1711261395885457739?s=20

‘खासगी लहान वाहनांना टोलमाफी आहे’ असं उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले ते धादांत खोटं आहे. इथून पुढे महाराष्ट्र सैनिक टोलनाक्यावर उभे राहतील आणि खासगी वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही आणि जर टोलवाल्यांनी बळजबरी केली तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा आहे !
https://x.com/mnsadhikrut/status/1711281422198268411?s=20

You cannot copy content of this page