मातृभाषेतून शिक्षण महत्वाचे! का आणि कसे?

पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून झाल्यास त्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता सक्षम होते. त्यांचा शैक्षणिक विकास उचित प्रकारे होतो. असे अनेक आधुनिक संशोधनातून समोर येत आहे. तरीही इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्यांना शिकविण्यासाठी पालकांची धडपड अजूनही कमी होत नाही. त्यातील मर्म समजण्यासाठी आपणास खालील व्हिडीओ पाहावे लागतील.

`मातृभाषेतून शिक्षण महत्वाचे’ ह्या विषयावर प्राचार्य डॉ. अर्जून कुंभार (इंग्रजी भाषेचे प्राध्यापक, संशोधक आणि संशोधकांचे मार्गदर्शक) यांनी मांडलेले विचार…

—————————

नामवंत प्रसिद्ध व्यासंगी साहित्यिक श्री. नामदेव माळी-
महाराष्ट्र शासन कर्मवीर भाऊराव पाटील सर्वोत्कृष्ट पुरस्कार विजेते श्री. नामदेव माळी यांनी मातृभाषेतून शिक्षण महत्वाचे का आणि ते शिक्षण कसं असावं? त्याबद्दल केलेले विचारमंथन आम्हाला विचार करायला लावतं! मराठीप्रेमी पालक महासंमेलनमध्ये त्यांचे भाषण झाले; ते पाहा!

————————–
मराठी प्रेमी पालक महासंमेलन
सहभाग: अभिनेत्री चिन्मयी सुमित, रेखाताई ठाकूर, मीना कर्णिक, आणि डॉ. नीलम गो-हे संवादक: शुभदा चौकर
पाल्याच्या शिक्षणाचं माध्यम निवडताना आई पालकाची भूमिका नेहमीच महत्वाची असते, ती मांडली विविध क्षेत्रातल्या आई पालकांनी. आपल्या, व आपल्या पाल्यांबद्दल आलेल्या अनुभवांसहित.

————————————————-

मराठीप्रेमी पालक महासंमेलन
मराठी माध्यमातल्या यशवंतांच्या यशोगाथा (भाग २)
मराठी माध्यमात शिकून करीयर कुठं होतं? या प्रश्नाला उत्तर म्हणजे हे सत्र आहे. Florida चे माजी गव्हर्नर अनिल देशपांडे, नम्रता वागळे, कबड्डीपटू मीनल जाधव, स्वाती थोरात, अभिनेत्री मयूरी वाघ, अभिनेता अंगद म्हसकर, डॉ. सुमित शिंदे, वैभव पटवर्धन आणि कॅप्टन अमेल यादव ही मंडळी या सत्रात सहभागी झाली. तर यांना बोलतं केलं ते प्रसिद्ध आरजे रश्मी वारंग यांनी.

——————-
मराठीप्रेमी पालक महासंमेलन
मराठी माध्यमातल्या यशवंतांच्या यशोगाथा (भाग १)
मराठी माध्यमात शिकून करीयर कुठं होतं? या प्रश्नाला उत्तर म्हणजे हे सत्र आहे. Florida चे माजी गव्हर्नर अनिल देशपांडे, नम्रता वागळे, कबड्डीपटू मीनल जाधव, स्वाती थोरात, अभिनेत्री मयूरी वाघ, अभिनेता अंगद म्हसकर, डॉ. सुमित शिंदे, वैभव पटवर्धन आणि कॅप्टन अमेल यादव ही मंडळी या सत्रात सहभागी झाली. तर यांना बोलतं केलं ते प्रसिद्ध आरजे रश्मी वारंग यांनी.

————————————————————–

श्री. मिलिंद चिंदरकर (शिक्षणतज्ञ)
मातृभाषेतील शिक्षण आणि पालकांशी संवाद (भाग २)
मराठीप्रेमी पालक महासंमेलन
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व आणि पालकांच्या मनातील शंका, प्रश्न यांना उत्तरं

———————————————

हे सर्व व्हिडीओ पाहिल्यानंतर मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *