आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मांडल्या जनतेच्या समस्या!

मुंबई (मोहन सावंत):- वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी आज रात्री विधानसभेत वर्सोवा मतदार संघातील नागरिकांच्या मुलभूत समस्यांना वाचा फोडली. अतिशय महत्वाचे प्रश्न उपस्थित करून सदर समस्या त्वरित सोडविल्या जाव्यात म्हणून शासनाकडे विनंती केली.

आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी ठाकरे सरकारच्या काळात निधी दिला नाही आणि विकासकामांना स्थगिती दिली होती; ह्याबाबत नाराजी व्यक्त करून शिंदे-फडणवीस सरकारमुळे विकासकामे सुरळीत सुरु असल्याबाबत समाधान व्यक्त केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल-एसव्ही रॉड ते इन्फिनिटी मॉल-लिंक रोड विस्तारित उड्डाणपुल आणि रस्ता तसेच एव्हीपी नगर ते अंबरनाथ टॉवर उड्डाणपुल, वार्ड ६३ मध्ये पावणेतीन एकर आकाराच्या टॅंक प्लॉटवरील क्रीडा संकुलाची दुरावस्था, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ज्या संस्थेच्या ताब्यात आहे त्या संस्थेचा मनमानी कारभार, नाट्यगृहाची आवश्यकता, ओशिवरा स्मशान भूमीची समस्या, मृणालताई गोरे उड्डाणपुल अशा अनेक समस्यांबाबत आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी आपली भूमिका मांडून सदर समस्या त्वरित सोडविल्या जाव्यात म्हणून शासनाकडे विनंती केली.

You cannot copy content of this page