उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२१

रविवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – १६
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक शुक्लपक्ष तृतीया सायंकाळी १६ वाजून २२ मिनिटापर्यंत
नक्षत्र- ज्येष्ठा रात्री २१ वाजून ०४ मिनिटापर्यंत
योग- अतिगंड सायंकाळी १९ वाजून ०७ मिनिटापर्यंत
करण १- गरज सायंकाळी १६ वाजून २२ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज ८ नोव्हेंबरच्या उत्तररात्री २ वाजून ४६ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- वृश्चिक रात्री २१ वाजून ०४ मिनिटापर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४४ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०१ मिनिटांनी

चंद्रोदय- सकाळी ९ वाजून ०७ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी २० वाजून २८ मिनिटांनी

भरती- रात्री ०१ वाजून १७ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून ०५ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०७ वाजून १७ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून १६ मिनिटांनी

दिनविशेष:- आज आहे विद्यार्थी दिवस!

ऐतिहासिक दिनविशेष:-
१६६५: साली सर्वात जुने जरनल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.
१८५८: साली लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म झाला.
१८७५: साली वंदे मातरम् हे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
१८७९: साली वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप अर्थात काळ्यापाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली.
१९०५: आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे हुबळी येथे निधन झाले.

You cannot copy content of this page