मिठबावकर कुटुंबियांकडून गोपुरी आश्रमास थंड पाण्याचा कुलर प्रदान

कणकवली (प्रतिनिधी)- गोपुरी आश्रमात काही काळ वास्तव्यास असलेले चंद्रकांत रावजी मिठबावकर (मुळगाव मिठबांव, तालुका- देवगड, सध्या राहणार आर्यादुर्गा नगर वागदे, तालुका- कणकवली) यांचे, २३,सप्टेंबर २०१९ रोजी दुःखद निधन झाले होते. गोपुरीआश्रमाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या स्मृती गोपुरी आश्रमात जागृत राहाव्यात याकरिता त्यांच्या पत्नी शुभदा मिठबावकर, मुलगे कमलेश व मयुरेश यांनी गोपुरी आश्रमामाला थंड पाण्याचा कुलर भेट म्हणून दिला. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव मंगेश नेवगे, कार्यकर्ते बाळकृष्ण सावंत, सदाशिव राणे उपस्थित होते.