पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक १२ डिसेंबर २०२१

रविवार दिनांक १२ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष शुक्लपक्ष नवमी रात्री २० वाजून ०१ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- उत्तरा भाद्रपदा रात्री २३ वाजून ५८ मिनिटांपर्यंत
योग- व्यतिपात १३ डिसेंबररच्या पहाटे ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत

करण १- बालव सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत
करण २- कौलव रात्री २० वाजून ०१ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मीन अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ०४ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजता

चंद्रोदय- दुपारी १३ वाजून ४१ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री ०१ वाजून १५ मिनिटांनी

भरती- सकाळी ०६ वाजून २४ मिनिटांनी आणि सायंकाळी १९ वाजून ४० मिनिटांनी
ओहोटी- रात्री ०० वाजून ०४ मिनिटांनी आणि दुपारी १३ वाजून ३० मिनिटांनी

राहुकाळ- सायंकाळी १६ वाजून ४० मिनिटांपासून ते सायंकाळी १८ वाजून ०२ मिनिटांपर्यंत

दिनविशेष- आज आहे स्वदेशी दिन अर्थात क्रांतिकारक बाबू गेनू सैद यांचा हौतात्म्य दिन

१८८२ साली बंगाली भाषेतील आनंदमठ ह्या बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या काल्पनिक कादंबरीचे प्रकाशन झाले. याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.

१९११ साली दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.

महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस!

आज आहे गोपीनाथ मुंडे यांची जयंती!

You cannot copy content of this page