उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२१

मंगळवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – २५
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक शुक्लपक्ष द्वादशी सकाळी ८ वाजून ०१ मिनिटापर्यंत
नक्षत्र- रेवती रात्री २० वाजून १३ मिनिटापर्यंत
योग- सिद्धि १७ नोव्हेंबरच्या उत्तररात्री ०१ वाजून ४५ मिनिटापर्यंत

करण १- बालव सकाळी ०८ वाजून ०१ मिनिटांपर्यंत
करण २- कौलव रात्री २० वाजून ५२ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मिन रात्री २० वाजून ५२ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४९ मिनिटांनी
सूर्यास्त- संध्याकाळी १७ वाजून ५८ मिनिटांनी

चंद्रोदय- दुपारी १६ वाजून १३ मिनिटांनी
चंद्रास्त- पहाटे ०४ वाजून ०८ मिनिटांनी

भरती- सकाळी १० वाजून ०२ मिनिटांनी आणि रात्री २२ वाजून ५३ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ४ वाजून ०८ मिनिटांनी आणि सायंकाळी १६ वाजून २७ मिनिटांनी

राहुकाळ- सायंकाळी १५ वाजून १२ मिनिटांपासून सायंकाळी १६ वाजून ३६ मिनिटांपर्यंत

दिनविशेष:- आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन,
१६ नोव्हेंबर १९९५ पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. मानवी मूलभूत हक्कांची जोपासना करीत असताना मानवतेची अस्मिता जपताना, मानवी मूल्यांची कदर करीत आपल्या पुढच्या पिढीला युद्धाच्या अरिष्टापासून वाचविण्यासाठी असहनशीलतेचा अंत व्हावा या उद्देशाने ‘युनेस्को’ने या दिवसाची घोषणा केली होती. मानवी बुद्धिमत्ता आणि एकजूट यांचा वापर करून पृथ्वीवर शांती पसरावी यासाठी राष्ट्रकुल सतत प्रयत्नशील असते. या दिवसाचे उद्दीष्ट संस्कृती आणि लोक यांच्यात परस्पर समज वाढवून सहिष्णुता वाढविणे आहे.

ऐतिहासिक दिनविशेष:-
१९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्‍नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन करून जातीय भेदाभेद संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले.

१९९६ साली कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ झाला.